पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर प्रयत्नपूर्वक मात करून पुन्हा सर्वसामान्य माणसांसारखे जीवन जगण्याचा संदेश देणारे ‘ब्युटी ऑफ लाईफ – द डायरी ऑफ कॅन्सर सर्व्हायवर’ या लेखिका आशा नेगी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि.२२) सायंकाळी पाच वाजता, निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह (लहान सभागृह) येथे करण्यात येणार आहे. (PCMC)
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक आणि संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशक सुनिता राजे पवार यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. (PCMC)
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आमदार अमित गोरखे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत, तर भारती विद्यापीठाचे प्रा. डॉ. वैभव ढमाल, कॅन्सर तज्ञ रेश्मा पुराणिक, ज्येष्ठ छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर, ईरा पब्लिकेशनच्या संस्थापिका अमृता तांदळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. न्यू इरा पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे शब्दांकन संजना मगर यांनी केले आहे. अशी माहिती ‘आर्ट लेख’ या संस्थेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
पहिल्या तीन रांगा मान्यवरांसाठी राखीव आहेत. सर्वांना नि:शुल्क प्रवेश आहे.