Junnar (रफिक शेख) : भाजप नेत्या आशाताई बुचके यांनी जुन्नर तालुक्यात मौजे राजुरी या ठिकाणी मंजूर करून आणलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. त्यानंतर बांधकाम मजुरांना कै. ह.भ.प. कोंडाजी बाबा डेरे आश्रम जुन्नर या ठिकाणी ऋषिकेश परिवार या संस्थेच्या माध्यमातून बांधकाम मजुरांना बांधकाम साहित्य त्याचप्रमाणे कौटुंबिक घरगुती साहित्य (भांडी) यांचे वाटप भाजपा नेत्या आशाताईं बुचके यांच्या हस्ते रविवारी (दि. 25) रोजी करण्यात आले. (Junnar)
यावेळी उपस्थित महिलांना पुणे जिल्हा भाजपा उद्योग आघाडीचे श्री .पि टी काळे यांनी उद्योजकीय मार्गदर्शन केले. ऋषिकेश परिवार संस्थेचे सुरेश जोशी यांनी आशाताई बुचके भाजप नेत्या यांच्या उपस्थितीबाबत स्वागत केले व कार्यक्रमाचे शेवटी आभार मानले. त्यानंतर संध्याकाळी चार वाजता नवीन एसटी स्टँड येथे जवळजवळ साडेआठ लाखाचे सांडपाण्याच्या गटारीचे भूमिपूजन भाजपा नेत्या सौ आशाताई बुचके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे, तालुका संयोजक भारतीय जनता पार्टी दिलीप गांजळे, एसटी आगरचे व्यवस्थापक मेमाणे, जुन्नर नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग हरीश गायकवाड, माजी नगराध्यक्ष अनिल मेहेर, अनिलजी रोकडे कृषी पर्यटन केंद्र तथा रोकडे फार्म हाऊस निरगुडे, युवा मोर्चाचे प्रमुख श्रीकांत मिरगुंडे, पुणे जिल्हा सरचिटणीस अनुसूचित जाती मोर्चा भाजपा जयदास साळवे, प्रसिद्ध उद्योजक तथा गुरुदत्त मिसळ हाऊस संजय चिखले, उद्योजक रोहित परदेशी, सांगडे डेअरी फार्म कैलास सांगडे, उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा विकास गायकवाड, तालुका सोशल मीडिया प्रमुख राजेश कोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :
जुन्नर : हिवरे शाळेत ‘गुड टच, बॅड टच’ ऐवजी “डोन्ट टच” चे धडे
जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभासह विविध उपक्रम
जुन्नर : उच्छिलच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपंचायतीच्या वतीने सी.सी.टि.व्ही.कॅमेरे
कंगना राणावतचे शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान, भाजपने झटकले हात
गटप्रवर्तकांना चार हजारांची वाढ असमाधानी ; पुन्हा आंदोलनाची घोषणा
बार्टीच्या ७६३ पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती
ब्रेकिंग : गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ