Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : भाजप उमेदवाराकडून 4.8 कोटींची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

मोठी बातमी : भाजप उमेदवाराकडून 4.8 कोटींची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

Chikkaballapura : कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर (Chikkaballapura) येथील निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉडने (एफएसटी) भाजप उमेदवाराकडून तब्बल ४.८ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. या बातमीने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या 14 जागांसाठी मतदानाच्या अगोदरच ही कारवाई करण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांनी सोशल मीडिया ‘एक्स’ वरून ही माहिती दिली आहे.

कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ‘X’ वर सांगितले की, चिक्कबल्लापूरच्या (Chikkaballapura) FST ने 4.8 कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. चिक्कबल्लापूर मतदारसंघाच्या राज्य निरीक्षण पथकाने 25 एप्रिल रोजी भाजप उमेदवार के सुधाकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की, चिक्कबल्लापुराच्या (Chikkaballapura) उड्डाण पथकाने येलहंका येथील घरातून ही रोकड जप्त केली. या प्रकरणात चिक्कबल्लापुरा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार के. सुधाकरविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. सुधाकर यांच्यावर आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. चिक्कबल्लापुरा मतदारसंघातही आज मतदान पार पडले या अगोदरच ही कारवाई करण्यात आली.

सीईओ म्हणाले की, सुधाकर यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 123 आणि आयपीसीच्या कलम 171 (बी, सी, ई, एफ) अंतर्गत लाचखोरी आणि मतदारांवर अन्यायकारक प्रभाव पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की छाप्यादरम्यान गोविंदप्पाच्या घरातून ५०० रुपयांचे अनेक बंडल सापडले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी घराचे मालक गोविंदप्पा यांची पैशांबाबत चौकशी केली. यानंतर भाजपचे उमेदवार सुधाकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आयकर विभागानेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

संपूर्ण कर्नाटकात सुमारे 50 कोटी रुपयांची रोकड आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. बेंगळुरूमध्ये आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत सुमारे ६,५५२ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : भाजप उमेदवाराकडून 4.8 कोटींची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

मोठी बातमी : WhatsApp ची भारतातून सेवा बंद करण्याची धमकी

बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!

ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला

मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय आहेत घोषणा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !

’महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन

शिरूर लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे 58 अर्ज

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !

संबंधित लेख

लोकप्रिय