Saturday, April 27, 2024
Homeताज्या बातम्यापुणे जिल्हयातील कोरोना बाधितांची संख्या 61 हजार 944

पुणे जिल्हयातील कोरोना बाधितांची संख्या 61 हजार 944

  

(पुणे) :-   पुणे जिल्हयातील 61 हजार 944 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 37 हजार 323 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 100 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 16 हजार 11, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 991 व पुणे कॅन्टोंन्मेंट 232, खडकी विभागातील 43, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 717, जिल्हा शल्य चिकीत्सक  यांच्याकडील  106  रुग्णांचा समावेश आहे.

        पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 99, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 254 व पुणे कॅन्टोंन्मेंट 30, खडकी विभागातील 27, ग्रामीण क्षेत्रातील 73, जिल्हा शल्य चिकीत्सक  यांच्याकडील  38 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 572 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.25 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.46  टक्के इतके आहे.

      पुणे विभागातील 43 हजार 430  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 75 हजार 288 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 29 हजार 732 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 126 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 815 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.69 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.82  टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

            कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 587 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 917, सातारा जिल्ह्यात 123, सोलापूर जिल्ह्यात 198, सांगली जिल्ह्यात  79 तर कोल्हापूर जिल्ह्यात 270 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय