Friday, May 17, 2024
Homeआरोग्यकोरोनाकोल्हापूर जिल्ह्यात आज ३ पॉझिटिव्ह; आजअखेर ६७६ जणांना डिस्चार्ज.

कोल्हापूर जिल्ह्यात आज ३ पॉझिटिव्ह; आजअखेर ६७६ जणांना डिस्चार्ज.

कोल्हापूर (प्रतिनिधी): आज रात्री ८ वाजेपर्यंत १५९ प्राप्त अवालापैकी 3 अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर ७३४ रूग्णांपैकी ६७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण ५० पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली. 

            आज रात्री ८ वाजेपर्यत वाजेपर्यत प्राप्त ३ पॉझीटिव्ह अहवाल हे भुदरगड -२, शिरोळ -१  तालुक्यातील आहे. आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- ७६, भुदरगड- ७३, चंदगड- ७५, गडहिंग्लज- ८६, गगनबावडा- ६, हातकणंगले- ११, कागल- ५७, करवीर- २१, पन्हाळा- २७, राधानगरी- ६८, शाहुवाडी- १८०, शिरोळ- ८, नगरपरिषद क्षेत्र- ११, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-२६ असे एकूण ७२५ आणि पुणे -१, सोलापूर-३, मुंबई-२, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-१ असे इतर जिल्हा व राज्यातील ९ असे मिळून एकूण ७३४ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. 

            जिल्ह्यातील एकूण ७३४ रूग्णांपैकी ६७६ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ८ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ५० इतकी आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय