जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेमधील दोन गटांमध्ये झालेल्या मारामारीत तब्बल १९ शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेला चार दिवस उलटले तरी जिल्हा परिषदेकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होताच चार दिवसांपासून हे शिक्षक फरार आहेत. त्यांना नेमून दिलेल्या शाळांवर ते कार्यरत नसल्याने वर्गदेखील वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.
जुन्नर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेच्या शिक्षकांमधील दोन गटात मारामारीची ही घटना रविवारी घडली. या संदर्भात जिल्हा परिषदेला सोमवारी कळविण्यात आले होते.
मात्र, गेल्या चार दिवसांमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून याबाबतचा कोणताही अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला नव्हता. मारामारी प्रकरणामध्ये जिल्हा परिषदेचे १९ शिक्षक असून त्यातील काही जण पतसंस्थेचे संचालक आहेत. या घटनेमुळे जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आणि विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये गावोगाव चर्चा सुरू आहे.
गुन्हा दाखल झालेले शिक्षक हे शाळेवर हजर नाहीत, विशेष म्हणजे या शिक्षकांनी खासगी कामानिमित्त रजेचा अर्ज केला असून दुसरीकडे हे प्रकरण मिटवण्यासाठी पुढाऱ्यांकडे बैठका सुरू आहेत. पण त्यातून काही मार्ग न निघाल्याने सर्वचजण गोंधळात आहेत.
गटशिक्षणाधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा
गटशिक्षणाधिकाची देखील हलाला असून गेल्या चार मध्ये कोणताही लेखी अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकायांना सादर केलेला नाही. दुसरीकडे जिल्हा परिषदेलादेखील सोमवारी या घटनेची पूर्ण माहिती देण्यात आलेली होती. त्यामुळे थेट कारवाई होने है देखी १९ शिक्षक गैरहजर असल्याने त्यांच्याकडील वर्ग दोन दिवसांपासून होते. काही शाळांवर अतिरिक्त शिक्षक देऊन वर्ग भरवण्यात परंतु संबंधित मुख्याध्यापकांनीदेखील गुन्हा दाखले शिक्षक शाळेवर नसल्याचा अहवाल देण्यास देखील उशीर केला आहे.
“१९ शिक्षक खासगी कामानिमित्त रजेवर गेले आहेत. रविवारी घडलेल्या घटनेबाबत आपण कोणताही अहवाल जिल्हा परिषदेला दिला नाही.”
– हेमंत गरिबे, गटविकास अधिकारी, जुन्नर
“मारामारी प्रकरणातील १९ जणांवर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेचा संपूर्ण अहवाल मागविण्यात आला आहे.”
– रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद