Friday, November 22, 2024
Homeराज्यमोठी बातमी : अदानी उद्योग समूहास महावितरणचे 13 हजार 888 कोटी रुपयांचे...

मोठी बातमी : अदानी उद्योग समूहास महावितरणचे 13 हजार 888 कोटी रुपयांचे मोठे कंत्राट 

मुंबई : प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी राज्य सरकारच्या महावितरण कंपनीचे मोठे कंत्राट अदानी उद्योगसमूहास मिळाले आहे. 13 हजार 888 कोटी रुपयांचे हे कंत्राट आहे. 13 thousand 888 crore rupees major contract of Mahavitran to Adani Udyog Group

महावितरणने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी एकूण सहा निविदा काढल्या होत्या, त्यापैकी दोन अदानी समूहाने मिळवल्या आहेत. अदानीला देण्यात आलेल्या दोन झोनमध्ये भांडुप, कल्याण आणि कोकण 63.44 लाख मीटर आणि बारामती आणि पुणे 52.45 लाख मीटर आहेत.

वीजग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी तसेच वीजेची गळती रोखण्यासाठी महावितरणने स्मार्ट कार्ड प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अदानी समूहाला मोठे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे अदानी समूहाला उर्जा मिळणार आहे. ‘महावितरण’च्या 15 विभागात 27 हजार कोटी रुपये खर्चून दोन कोटी स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत.

कोकण विभागात 63 लाख स्मार्ट मीटर बसविण्यासाठी तब्बल 13 हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांचे कंत्राट अदानी इलेक्ट्रिकल कंपनीला देण्यात आले आहे. अॅडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सेवेसाठी ‘महावितरण’ने निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये अदानी इलेक्ट्रिकलसह एनसीसी, माँटेकार्लो, जीनस पॉवर या कंपन्यांना दोन कोटी स्मार्ट मीटर बसविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यापैकी निम्म्या रकमेचे कंत्राट एकट्या अदानी इलेक्ट्रिकल कंपनीला देण्यात आले आहे.

कोकण विभागात 7 हजार 594 कोटी रुपये खर्चून 63 लाख 44 हजार 066 मीटर्स ‘अदानी इलेक्ट्रिकल’ कंपनी बसवणार आहे.

नाशिक व जळगाव आणि लातूर, नांदेड व औरंगाबाद विभागात 56 लाख स्मार्ट मीटर एनसीसी कंपनी तर, चंद्रपूर, गोंदिया व नागपूर विभागात माँटेकार्लो कंपनी 30 लाख स्मार्ट मीटर बसविणार आहे, तर अकोला व अमरावती विभागात ‘जीनस पॉवर’ कंपनी 21 लाख स्मार्ट मीटर बसवणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय