राहुल गांधी सोनिया गांधी यांचे मुंबईत जोरदार स्वागत
मुंबई : विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (I.N.D.I.A.) ची तिसरी बैठक आजपासून मुंबईत सुरू होत आहे. ही बैठक दोन दिवस (31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर) चालेल.
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे या बैठकीसाठी मुंबई विमानतळावर आले असता, त्यांचं कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. महाराष्ट्रीयन पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात यावेळी दोघांचही स्वागत मुंबई विमानतळावर करण्यात आलं. मुंबईत आल्यावर लगेच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदे घेतली.
या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानींवर तोफ डागली आहे. तसंच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. हिंडनबर्गच्या आरोपानंतर सेबीनं केलेल्या अदानींच्या चौकशीवरही राहुल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी शांत का आहेत, असाही प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची जेपीसी चौकशी केली पाहिजे, सेबीने अदानीना क्लिनचिट दिली आहे, आणि सेबीच्या ज्या अधिकाऱ्याने अदानी यांना क्लीन चिट दिली, तोच आता गौतम अदानी यांच्या एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचा संचालक आहे. त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
“1 बिलियन डॉलर भारतातून अदानींच्या कंपनींच्या नेटवर्ककडून वेगवेगळ्या देशात गेला आणि देशात आला. त्यातून अदानी यांनी आपले शेअर्सची किंमत वाढवली. त्याच किंमतीच्या फायद्यातून अदानी विमान, पोर्ट विकत घेत आहेत. त्यांना धारावीत मोठा प्रोजेक्ट मिळाले आहेत”, असा आरोपही राहुल गांधींनी केला.
राहुल गांधी यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून छापलेल्या वृत्तपत्राचा आढावा घेत अदानी समूहावर हल्लाबोल उठवला आहे. अदानी समूहाचे आणि भाजपचे खुप जवळचे संबंध आहेत. आणि त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही कारवाई करण्यास वेळ लागत आहे. राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोप केले आहे. अदानी समूहाच्या या घोटाळ्यामध्ये भारतातला तुमचा आणि आमचा पैसे हा परदेशात जात आहे. आपल्या कष्टाची कामे ही बाहेरच्या देशात जात आहे. हा आपला कमावलेला पैसे भाजप आणि अदानी समूहामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचे देखील दिसून आले आहे. जर आपल्याला देशाचे हित घडवायचे आहे तर पारदर्शकता असणे महत्वाचे आहे. असे देखील राहुल गांधी म्हणाले.
विरोधकांच्या INDIA आघाडीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), जनता दल युनायटेड, द्रविड मुनेत्र कळघम, आम आदमी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML), केरळ काँग्रेस (एम), झारखंड मुक्ती मोर्चा, शिवसेना (UBT), राष्ट्रीय लोक दल, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम, भारतीय शेतकरी आणि मजूर पक्ष, क्रांतिकारी समाजवादी पक्ष (भारत), विदुथलाई चिरुथाईगल काची, आसाम राष्ट्रीय परिषद, गोवा फॉरवर्ड पार्टी, केरळ काँग्रेस (जेकब), राष्ट्रवादी काँग्रेस केरळ, आंचलिक गण मोर्चा इ प्रमुख पक्ष आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, आपचे खासदार राघव चढ्ढा, फारुख अब्दुल्ला, डी. राजा यांच्यासह देशभरात महत्वाचे नेते मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दाखल झाले आहेत.