Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयआताची मोठी बातमी : देशात मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता, देशात 'एक देश...

आताची मोठी बातमी : देशात मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता, देशात ‘एक देश एक निवडणूक’ ?

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबई मध्ये होत आहे. अशात आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे. लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारकडून संसदेचे ५ दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. १८ ते २२ सप्टेंबर या काळात हे विशेष अधिवेशन पार पडणार आहे. विशेष म्हणजे नुकतेच संसदेचे अधिवेशन संपले असताना पुन्हा हे अधिवेशन बोलविल्याने केंद्र सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती समोर येत आहे.

विरोधकांना धक्का देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. केंद्र सरकारने बोलावलेले हे संसदेचं शेवटचं अधिवेशन असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अधिवेशनात ५ सत्र होणार आहेत. या विशेष अधिवेशनात समान नागरी कायदा, महिला आरक्षण विधेयकही याच अधिवेशनात आणलं जाणार असल्याचं समजतंय.

गेल्या अनेक वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन यावर चर्चा सुरू आहे. या अधिवेशनात ‘एक देश एक निवडणूक’ विधेयक (One Nation One Election Bill) आणणार असल्याची माहितीही माध्यमांमध्ये येत आहे. त्यामुळे तसे झाले तर या अधिवेशनानंतर विद्यमान लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुका होऊ शकतात.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय