Sunday, May 19, 2024
Homeराज्यकेरळ : देवभूमी दुष्काळाच्या छायेत, परतीच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष

केरळ : देवभूमी दुष्काळाच्या छायेत, परतीच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष

कालीकत / जलील बाबू : नैऋत्य मोसमी पावसाने ८ जून रोजी केरळच्या किनारपट्टीवर धडक दिली, परंतु तेव्हापासून पाऊस निराशाजनक आहे, शेकडो दशकापासून देशातील मान्सून केरळ मध्ये आधी दस्तक देतो. राज्यात 8 जून रोजी सुरूवातीच्या पहिल्या पावसानंतर गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यात पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू आहे. जून ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत जास्तीत जास्त पाऊस पडतो, जो 2023 मध्ये खूपच कमी झाला आहे.

हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, 1 जून ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यात सरासरी 1556 मिमी पाऊस पडत असला तरी यंदा केवळ 877.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याचा अर्थ 44 टक्के पाऊस कमी आहे. जूनमध्ये पावसाची तीव्र कमतरता होती आणि हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार राज्यात 60 टक्क्यांनी तूट होती, तर जुलैमध्ये पाऊस राज्यातील काही निवडक भागात झाला आणि तूट केवळ 9 टक्के होती. मात्र, राज्यातील अनेक भागात ऑगस्टमध्ये पाऊसच न झाल्याने ऑगस्टमधील परिस्थिती बिकट आहे.

केरळमध्ये साधारणपणे ऑगस्टमध्ये पाऊस पडतो जो मल्याळम महिना ‘कारकिडकम’ महिन्यात असतो. केरळची अर्थव्यवस्था म्हणजे नारळ, सुपारी, तांदूळ, चहा मळे, मसाला पिके याची उत्पादकता मान्सूनवर अवलंबून आहे. मात्र, पावसाअभावी राज्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील 15 दिवस राज्यात पाऊस पडणार नसल्याचा अंदाज वर्तवला असून त्यामुळे दुष्काळाची शक्यता वाढली आहे. सप्टेंबरमध्येही परिस्थिती चांगली नाही कारण या महिन्यात राज्यात साधारणपणे फारच कमी पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात सरासरी 2018.7 मिमी पाऊस पडतो, त्यापैकी सप्टेंबरमध्ये केवळ 13 टक्के पाऊस पडतो.

राज्याच्या धरणांमधील पाण्याची पातळी देखील चिंताजनकपणे खालच्या पातळीवर आहे आणि केरळ राज्य विद्युत मंडळाद्वारे व्यवस्थापित केलेले जलाशय (राज्य मुख्यत्वे जलविद्युत प्रकल्पांद्वारे निर्माण होणाऱ्या विजेवर अवलंबून आहे) साठवण क्षमतेच्या केवळ 37 टक्के आहे. केरळच्या तांदूळ उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

वर्षभरात ऐंशी टक्क्यांहून अधिक पाऊस कमी झाला आहे. साडेतीन वर्षांपूर्वी आलेल्या पुरानंतर पडलेल्या पावसात जलसंधारणासाठी शास्त्रीय पद्धतींचा अभाव असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. टँकर लॉरींद्वारे दिले जाणारे पाणी हा एकमेव उपाय आहे. दोन दिवस खासगी टँकरची वाट पाहावी लागत आहे. पाणीटंचाईमुळे कृषी क्षेत्रावरही भीषण संकट निर्माण झाले आहे. केरळ मधील पलक्कड, कन्नूर, कोझिकोड, त्रिशूर, कोट्टायम, अलप्पुझा या प्रमुख जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय