पिंपरी, चिंचवड विधानसभेतील पदाधिका-यांना नियुक्तीपत्राचे होणार वाटप
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेचा शनिवार, दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी काळेवाडी (PCMC) येथील इंदू लॉन्स येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्य़ात प्रमुख नेते व पदाधिका-यांच्या उपस्थितीत पिंपरी विधानसभा व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्तीपत्राचे वाटप होणार आहे, अशी माहिती युवासेना शहरप्रमुख चेतन पवार यांनी दिली.
युवासेनेचा मेळावा काळेवाडी येथील इंदू लॉन्स येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार (Sanjog Waghere Patil) संजोग वाघेरे पाटील, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, माजी शहरप्रमुख योगेश बाबर यांच्यासह शहरातील युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी, उपशहर प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, विधानसभाप्रमुख, विधानसभा उपप्रमुख, तसेच प्रमुख पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. PCMC NEWS
मावळ लोकसभा मतदारसंघात (Maval loksabha 2024) व पिंपरी विधानसभा मतदारसंघात युवासेनेच्या नवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्तीपत्राचे वाटप होणार आहे. त्यासोबत लोकसभा निवडणुकीसंदर्भात युवासेनेच्या पदाधिका-यांना मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती चेतन पवार यांनी दिली आहे.
हे ही वाचा :
आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!
बापरे! कोरोना नंतर चीनमधून “ही “नवीन समस्या जगात विध्वंस पसरवणार
भरघोस उत्पादन देणारी अशी करा उन्हाळी भुईमूग लागवड
ब्रेकिंग: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर!
कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल
DME : वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत 233 जागांसाठी भरती