Sunday, May 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAlanadi : एकादशी दिनी आळंदीत भाविकांची दर्शनास गर्दी

Alanadi : एकादशी दिनी आळंदीत भाविकांची दर्शनास गर्दी

श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील पापमोचनी (papmochani ekadashi) एकादशी निमित्त माऊली मंदिरात पन्नास हजाराहून जास्त भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरात माऊलीची लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला.

यावेळी आळंदी देवस्थांनचे व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने,सेवक, कर्मचारी, मानकरी, सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचारी यांनी नियोजन करीत भाविकांना कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन सुलभ देण्यासाठी नियोजन केले. Alandi news

वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने देहूकर यांचे वतीने कीर्तन सेवा, रात्री आरती झाली. श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली. Alandi news

आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस. नरके, दिघी वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्तावरील पोलिस यांनी विशेष परिश्रम घेऊन आळंदीतील (ALANDI) वाहतूक व भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष परिश्रम घेतले. यामुळे आळंदीत नागरिक, व्यापारी, पोलीस मित्र यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

बापरे! कोरोना नंतर चीनमधून “ही “नवीन समस्या जगात विध्वंस पसरवणार

भरघोस उत्पादन देणारी अशी करा उन्हाळी भुईमूग लागवड

ब्रेकिंग: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर!

कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

DME : वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत 233 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय