Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडहोय, पिंपरी-चिंचवड बदलतंय… विकसित होतंय..!

होय, पिंपरी-चिंचवड बदलतंय… विकसित होतंय..!

पिंपरी चिंचवड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडूलकर :
समाविष्ट गावांसह संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला आंद्रा प्रकल्पांतर्गत चिखली येथील १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण, भामा आसखेड प्रकल्पातील जॅकवेल उभारणी आणि महापालिक प्रशासकीय भवनाच्या कामाचे भूमिपूजन पुण्यातील ग. दि. माडगूळकर सभागृह आकुर्डी येथे सोमवार, दि. १५ मे २०२३, सकाळी : ११ वा. होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पुढाकाराने शहराच्या लौकीकात भर घालणारे ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, शाळांच्या इमारती, आरोग्य विषयक प्रकल्प, समाविष्ट गावांमधील अग्निशमन उपकेंद्र असे एकूण २२ पथदर्शी प्रकल्पांचे भूमिपूजन/ लोकार्पण करण्यात येणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते हा संस्मारणीय सोहळा होत आहे. या सोहळ्याला पिंपरी-चिंचवडकरांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय