Wednesday, April 24, 2024
Homeआंतरराष्ट्रीयव्हिडिओ : 'मोका' चक्रीवादळ म्यानमार बांग्लादेश मध्ये दाखल

व्हिडिओ : ‘मोका’ चक्रीवादळ म्यानमार बांग्लादेश मध्ये दाखल

नवी दिल्ली: आज सायंकाळी मोका चक्रीवादळाने म्यानमार व बांगलादेशात प्रवेश केला असून २१० ताशी किमी वेगाने वादळ बंगालच्या उपसागरात दाखल होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार , मोचा चक्रीवादळ रविवारी पहाटे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर केंद्रस्थानी होते. आंध्रप्रदेश ,ओरिसा, पश्चिम बंगाल या तटीय राज्यात वादळाचा प्रवेश होऊ शकतो.


आग्नेय बांगलादेश आणि उत्तर म्यानमार किनारपट्टी ओलांडून कॉक्स बाजार (बांगलादेश) आणि क्यूकप्यू (म्यानमार) दरम्यान, सिटवे (म्यानमार) जवळ वादळाने प्रभाव दाखवण्यास सुरवात केली आहे. तुफानी पाऊस व भूस्खलन यामुळे बांगलादेश व म्यानमारमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय