Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडछत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तरुणाचा अनोखा सायकल प्रवास

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तरुणाचा अनोखा सायकल प्रवास

तळेगाव/क्रांतीकुमार कडुलकर:दि.१४-स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तळेगाव दाभाडे ते गेट ऑफ इंडिया मुंबई भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या वतीने सायकलने प्रवास करून दोन तरुणांनी अनोखी मानवंदना दिली.

भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या वतीने प्रदेश संघटक वेदांग महाजन व रोहित पाठक यांनी तळेगाव दाभाडे ते गेट ऑफ इंडिया मुंबई सायकलने प्रवास करून ऐतिहासिक छत्रपती संभाजी महाराज जन्म उत्सव २०२३ या ठिकाणी भेट देऊन छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.

सायकल प्रवास सकाळी ५.४० सुरुवात केली दुपारी १.३० गेट ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी १२९ किलोमीटरचा सायकलने साडेसात तास प्रवास करून पोहचले. तेथील शिवप्रेमींनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय