Thursday, November 21, 2024
Homeक्रीडाविश्वHardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याला मिळणार डच्चू ?

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याला मिळणार डच्चू ?

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू आणि स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सने दिलेले कर्णधारपद आणि वैयक्तिक आयुष्यातील बदल यामुळे तो सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता हार्दिक पांड्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स संघ हार्दिकला रिलिज (करारमुक्त) करण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या वानखेडे स्टेडियम येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आयपीएलचे अधिकारी आणि संघांचे मालक एकत्र आले होते. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, आणि त्यानंतर हार्दिक पांड्याला रिलिज करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 2024 साली मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) पुन्हा संघात सामील केले होते आणि त्याला कर्णधारपदाची धुरा दिली होती. मात्र, हार्दिकच्या नेतृत्त्वात संघाने अपेक्षित कामगिरी केली नाही, आणि प्लेऑफमध्ये देखील स्थान मिळवता आले नाही.

Hardik Pandya ला डच्चू मिळणार ?

आयपीएलच्या नियमांनुसार, प्रत्येक तीन वर्षांनी मेगा ऑक्शन आयोजित केले जाते. या वर्षी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये सर्व 10 संघांना फक्त चार खेळाडूंना रिटेन करता येईल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रित बुमराह, आणि तिलक वर्मा या चार खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता आहे, तर हार्दिक पांड्याला रिलिज केले जाऊ शकते.

सध्या सूर्यकुमार यादव भारतीय टी-20 संघाचा कर्णधार आहे, आणि त्यामुळे मुंबई इंडियन्स त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवू शकते. या स्थितीत रोहित शर्मा सूर्यकुमारच्या नेतृत्त्वात खेळू शकतो.

मुंबई इंडियन्सचा हा निर्णय आयपीएलच्या आगामी हंगामावर मोठा परिणाम करू शकतो. पुढील काही महिन्यांत या संदर्भात अधिकृत घोषणा होईल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे आयपीएलच्या चाहत्यांना आगामी हंगामासाठी उत्सुकता लागून राहिली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल

ब्रेकिंग : खेळाडूंसाठी BCCI ने केली मोठी घोषणा

निशांत देवची निराशा, ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी हुकली

राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट

कोलकाता विमानतळ बनले तलाव; बंगाल मध्ये तुफान पाऊस, व्हिडिओ व्हायरल

बीएएमएस पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; 3000+ जागांसाठी भरती

पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

संबंधित लेख

लोकप्रिय