Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याBAMS : बीएएमएस पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

BAMS : बीएएमएस पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन (बीएएमएस) BAMS पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या समवेत वर्षा येथे झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत, महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना राज्याच्या कोट्यातून पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना निर्देश दिले की, या विद्यार्थ्यांना अन्याय होऊ नये यासाठी पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक बदल करून ते त्वरित मान्यतेसाठी सादर करावेत. त्यामुळे आता राज्याच्या ८५% कोटा (शासकीय व खाजगी अनुदानित) तसेच ७०% कोटा (खाजगी विना अनुदानित) या कोट्यातून अन्य राज्यातून बीएएमएस (BAMS) केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीचा मार्ग सुकर होणार आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?

Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार

ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

संबंधित लेख

लोकप्रिय