Friday, November 22, 2024
HomeNewsदारू पिणे अचानक बंद केले तर काय होईल ? महत्वाची माहिती

दारू पिणे अचानक बंद केले तर काय होईल ? महत्वाची माहिती

पुणे : आपण अनेक ठिकाणी दारू पिणं आरोग्यास हाणीकारण आहे असं वाचलं असेल. पण तरीही काही लोक मोठ्या प्रमाणात दारूचं सेवन करतात. आपले शरीर एका तासात फक्त एक पेय आणि दिवसातून एकूण 3 पेये पचवू शकतं.पण जर एखाद्या व्यक्तीला मद्यपानामुळे आरोग्याच्या समस्या होत असतील तर तो दारू पिणं बंद करतो. पण याचे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात.

जर तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या शरीराला दीर्घकाळ दारू पिण्याचं व्यसन असेल आणि ते अचानक बंद झालं तर शरीराची यंत्रणा बिघडू शकते. तुमचे डॉक्टर तुम्हाला मद्यपान सोडण्याचा सर्वोत्तम मार्ग सांगतील.अल्कोहोल सोडल्यानंतर शरीर कधी सामान्य होतं हे तुमचं वय, वजन आणि मद्यपानाच्या सवयी तुमचे शरीर किती लवकर योग्य प्रतिसाद देते यावर अवलंबून असेल.

उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती बर्याच काळापासून जास्त प्रमाणात मद्यपान करत असेल, तर अल्कोहोल सोडल्यानंतर शरीराला सामान्य स्थितीत येण्यास जास्त वेळ लागेल.शरीराला अल्कोहोलपासून मुक्त होण्यासाठी सुमारे एक आठवडा लागतो. तुम्ही भरपूर मद्यपान करत असल्यास, तुम्ही सोडल्यानंतर तुमच्या शरीराला सामान्य स्थितीत येण्यासाठी काही महिने लागू शकतात.

नैराश्य, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, थकवा, अस्वस्थता, चिडचिड, भावनिक, उच्च रक्तदाब, डोकेदुखी, भूक न लागणे, घाम येणे, निद्रानाश असे त्रास होतील.

संबंधित लेख

लोकप्रिय