Monday, May 20, 2024
Homeग्रामीणजहागीरदावाडी येथे वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

जहागीरदावाडी येथे वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

(तांडा):-  जहागीरदावाडी येथे काल वसंतराव नाईक यांची १०७ वी जयंती पार पाडली. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन तांड्याचे विद्यमान उपसरपंच केशव रतन चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य राजु रुपा राठोड तसेच गावातील शिक्षक अमोल राठोड, उत्तम चव्हाण यांनी केले. 

      या जयंतीच्या निमित्ताने “वसंतराव नाईक आणि कृषी क्रांती” या विषयावर बळीराम शेषेराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी वसंतराव नाईक यांच्या हरीत क्रांतीच्या विविध पैलू वर आपले विचार प्रकट केले त्यामध्ये ज्वारी, गहु एकाधिकार योजना, कापूस एकाधिकार योजना, महाबीज योजना, धवलक्रांती, श्वेतक्रांती, फलोत्पादन, रोजगार हमी योजना इ. त्यांच्या काळातील यशस्वी योजनांबद्दल मार्गदर्शन केले. 

       या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल राठोड यांनी केले, प्रास्ताविक राजु रुपा राठोड यांनी केले तर आभारप्रदर्शन उत्तम चव्हाण सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीकांत चव्हाण, प्रमोद चव्हाण, श्रीकांत चव्हाण, ऋतेश राठोड, समाधान राठोड, ईश्वर जाधव व समस्त गावकरी मंडळी यांनी मेहनत घेतली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय