Friday, May 10, 2024
Homeराज्यवीजग्राहक व संघटनांच्या प्रतिनिधींसोबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे साधला...

वीजग्राहक व संघटनांच्या प्रतिनिधींसोबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे साधला संवाद

(मुंबई) :-  कोल्हापूर येथील वीजग्राहक व विविध औद्यागिक संघटनांच्या राज्यस्तरीय समन्वय समितीसोबत ऊर्जामंत्री ना. डॉ नितीन राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगव्दारे बैठक घेऊन त्यांच्या विविध विषयांवर चर्चा केली.

      या बैठकीमध्ये संघटनेने उद्योगांचा स्थिर आकार ६ महिन्यांसाठी रद्द करावा. उद्योगांना लॉकडाऊन कालावधीतील वीजबिल थकबाकी भरण्यासाठी ६ महिने हप्ते व मुदत (विना व्याज व विलंब आकार) द्यावी. लघुदाब उद्योगांची पॉवर फॅक्टर पेनल्टी ६ महिन्यांसाठी रद्द करावी. उच्चदाब उद्योग व उपसा सिंचन योजना यांचे केव्हीएएच बिलींग मार्च २०२१ अखेर एक वर्षासाठी रद्द करण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा व रात्री वीजपुरवठा उपलब्ध करुन द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या. उद्योग संघटनांनी केलेल्या या मागण्यावर मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, राज्य शासन व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याविषयांवर चर्चा व समन्वय साधून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी  दिले.

        या व्हिडिओ कॉन्फरंसिंग बैठकीस गृह राज्यमंत्री (शहर) ना. श्री. सतेज पाटील, खा. धैर्यशील माने, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे, आ. प्रकाश आवडे, आ. राजेश पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. रुतुराज पाटील, श्री. प्रताप होगाडे, श्री. विक्रांत पाटील किणीकर यांच्यासह महावितरणचे संचालक (संचालन) श्री.दिनेशचंद्र साबू, संचालक (वाणिज्य) श्री.सतिश चव्हाण, कार्यकारी संचालक (महसूल व देयके) श्री योगेश गडकरी व इतर अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय