Friday, May 10, 2024
Homeराज्यशाळा सुरू करण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

शाळा सुरू करण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

(प्रतिनिधी):- शाळा कधी सुरू होणार? शाळा ऑनलाईन असणार का? याकडे पालकांचे लक्ष लागले होते. आता पालकांची चिंता दूर झाली असून शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

        मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. या बैठकीत ऑनलाईन / डिजिटल माध्यमातून शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता दिली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण व तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.

      तसेच मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय हे देखील उपस्थित होते. ज्या ठिकाणी शाळा प्रत्यक्ष सुरु होत आहेत. तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

          रेड झोन वगळता ९, १०, १२ शाळा कॉलेज जुलैपासून होणार सुरूवात, ६ वी ते ८ वी ऑगस्ट पासून तर ३ री ते ५ वी सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तर १ ली व २ री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने सुरू करण्याचे नियोजन आहे.

         ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. पहिली , दुसरीसाठी ऑनलाईन शिक्षण होणार नाही. ३ ते ५ वीच्या मुलांना दररोज १ तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाईन शिक्षण देण्याचे नियोजन असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय