Friday, April 26, 2024
Homeराज्यदेशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उध्दव ठाकरे पाचव्या स्थानी

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उध्दव ठाकरे पाचव्या स्थानी

 

मुंबई  : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन करत पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान उद्धव ठाकरे यांनी मिळवला. कोरोनाच्या वैश्विक महामारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करत असताना त्यांनी देशातील चांगल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे.

इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्स या संस्थेच्या माध्यमातून संयुक्तपणे  सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामधील निष्कर्षातून टॉप ५ नाव समोर आली आहे.  पहिल्या स्थानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला स्थान कायम राखले आहे. या अगोदरच जानेवारी महिन्यात याच संस्थेकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हा आणि आज उद्धव ठाकरे यांच्यामधील लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सात टक्के लोकांनी उद्धव ठाकरे हे चांगले काम करत असल्याचं सांगितलं आहे . तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांना जानेवारीमध्ये १८ टक्के लोकांनी पसंती दिली होती. ती आता २४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय