Friday, April 19, 2024
Homeआरोग्यकोरोना अपडेट:- जिल्ह्यात आज ३७७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,वाचा सविस्तर

कोरोना अपडेट:- जिल्ह्यात आज ३७७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,वाचा सविस्तर

 

औरंगाबाद,( दि.०८) : औरंगाबाद जिल्ह्यात आज १८६ जणांना (मनपा ७४, ग्रामीण ११२) सुटी देण्यात आली. आजपर्यंत १२,१४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण ३७७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६,४९० झाली आहे. आजपर्यंत एकूण ५३५ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ३८०९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

सकाळनंतर २४७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ६६, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ४२ आणि ग्रामीण भागात १२४ रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण भागातील रुग्ण (१३०)

 

काझी मोहल्ला, कन्नड (१), रांजणगाव (१), औरंगाबाद (१८), फुलंब्री (१५), गंगापूर (४०), कन्नड (२४), सिल्लोड (१६), पैठण (१३), पिंपळगाव, फुलंब्री (१),चित्तेपिंपळगाव (१)

सिटी एंट्री पॉइंट (६६)

रांजणगाव (१), चिकलठाणा (१), एन चार (१), वाळूज (२), सावित्री नगर (१), रमा नगर (१), पद्मपुरा (४), जाधववाडी (१), शिवाजी नगर (१), हर्सूल (२), घृष्णेश्वर (१), बजाज नगर (६), कांचनवाडी (१), मिटमिटा (२), श्रेय नगर (४), टाकळी ,खुलताबाद (१), कडेठाण, पैठण (१), गुरूदत्त नगर (१), मयूर पार्क (२), पवन नगर (२), जोगेश्वरी (१), वडगाव (१), बीड बायपास (२),  सातारा परिसर (२),  कांचनवाडी (५), नक्षत्र पार्क (२), देवळाई (३), जालन नगर (१), चितेगाव (१), कोकणवाडी (१), ढोरकीन (१),  चिकलठाणा (४), मुकुंदवाडी (१), पडेगाव (३), अन्य (२)

मनपा हद्दीतील रुग्ण (०९)

माजी सैनिक कॉलनी, पडेगाव (१), उल्कानगरी, गारखेडा परिसर (१), बीड बायपास (१), सिडको (१), उस्मानपुरा (१),एमजीएम निवासी वसतीगृह परिसर (१),  राज पार्क कॉलनी,हिना नगर (१), बन्सीलाल नगर (१), अन्य (१) 

नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत रांजणगाव, शेणपूजीतील ६० व ७२, पद्मपुऱ्यातील लालमन कॉलनीतील ७१, बिल्डा,फुलंब्रीतील ७१, लोणी (खु.) ७८ वर्षीय पुरूष आणि छावणीतील ७३,गंगापूर तालुक्यातील सावखेड्यातील ७० वर्षीय महिला तर खासगी रुग्णालयात  अजिंठा, सिल्लोड येथील ६३, देवगाव रंगारीतील ७२ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय