Wednesday, May 22, 2024
HomeNewsतुर्की,सिरीयात मृतांची संख्या 21,000 पेक्षा जास्त

तुर्की,सिरीयात मृतांची संख्या 21,000 पेक्षा जास्त

भूकंप ग्रस्त भागात भारतीय मदत पथके अहोरात्र काम करत आहेत.

अंकारा
: तुर्कस्तान आणि मलेशियातील बचाव कर्मचारी गाझियानटेपच्या ग्रामीण भागात नुरदागी येथे कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढत आहेत.तुर्कस्तानमध्ये बचावाचे प्रयत्न सुरूच आहेत जरी इतक्या दिवसांनंतर लोक जिवंत सापडण्याची शक्यता कमी होत आहे.

तुर्की-सीरियातील भूकंपातील मृतांची संख्या 21,000 च्या पुढे गेली आहे. उपराष्ट्रपती फुआत ओकटे यांच्या म्हणण्यानुसार तुर्कीमध्ये किमान 17,674 लोक मारले गेले आहेत, तर सीरियामध्ये किमान 3,377 लोक मरण पावले आहेत.जागतिक बँकेने तुर्कीला मदत 1.78 अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. युनायटेड नेशन्सचा पहिला मदत काफिला तुर्कस्तानमधून विरोधकांच्या ताब्यातील उत्तर-पश्चिम सीरियात पोहोचला आहे. सीरियन सरकारच्या नियंत्रणाखालील भागात न जाता संयुक्त राष्ट्रांची मदत नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

भारताची ग्लोबमास्टर,हर्क्युलस विमाने आणि मदत पथकांची व्यापक मोहीम

भारतीय हवाईदलाची C 17 ग्लोबमास्टर व हर्क्युलस C 130 ही महाकाय विमाने एनडीआरएफ टीमसह तुर्कस्तान मध्ये दोन दिवसापूर्वी पोचली आहेत.औषधे,निवारासाहित्य,श्वानपाथके,अन्नधान्य इ सारी मदत भारत सरकार तुर्कीला देत आहे.परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सीरियन राजदूत बासम अल खतीब यांच्याशी चर्चा केली आहे.सिरीयात भारत मदत पाठवणार आहे.उध्वस्त रस्ते,ढिगारे,पाणी व वीज समस्या गंभीर बनली आहे.भूकंपामुळे तुर्की,सीरिया मधील शेकडो रस्ते उध्वस्त झाले.पाणी,वीज पुरवठा वाहिन्यांचे नुकसान झाले.एकूण 95 देशातील मदत पथके इथे काम करत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय