Tuesday, May 21, 2024
HomeNewsकेंद्र सरकारचे परिपत्रक जारी ,आता "हिच्यासोबत" साजरा करा प्रेम दिवस (velentine day)..

केंद्र सरकारचे परिपत्रक जारी ,आता “हिच्यासोबत” साजरा करा प्रेम दिवस (velentine day)..

जगभरात १४ फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जाणार आहे. मात्र, आता पशु कल्याण मंडळाकडून व्हॅलेंटाईन डे ऐवजी १४ फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ साजरा करण्याची मागणी करण्यात आली आहे.असे परीपत्रकच जारी करण्यात आले आहे.

१४ फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावे आणि व्हॅलेंटाईन डे ऐवजी ‘काऊ हग डे’ साजरा करावा, असे आवाहान प्राणी कल्याण मंडळाने केले आहे. गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ती कामधेनू आणि गौमाता म्हणून ओळखली जाते. गायीला मिठी मारल्याने भावनिक उन्नती होते. म्हणूनच गाईवर प्रेम करणाऱ्या लोकांनी १४ फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ साजरा करावा. तसेच हा दिवस साजरा करताना गायीला आपली माता समजा असे एडब्ल्यूबीएने जारी केलेलय पत्रात म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय