Tuesday, May 21, 2024
HomeNewsभारतात आता E-Vehicles स्वस्त होणार? जम्मू-काश्मीरमध्ये सापडले लिथियमचे साठे

भारतात आता E-Vehicles स्वस्त होणार? जम्मू-काश्मीरमध्ये सापडले लिथियमचे साठे

जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात लिथियमचा मोठा सापडला असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. रियासी जिल्ह्यातील सलाल-हिमाना प्रदेशात लिथियमचा साठा सापडला आहे.याचा वापर इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरी तयार करण्यासाठी होतो. जम्मू काश्मीरमध्ये ५.९ लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे त्यामुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाला बळ मिळू शकते व या लिथियमच्या साठ्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती स्वस्त होणार का? याबाबत ही उत्सुकता आहे.

सध्या देशभरात इलेक्ट्रिक वाहनांची पसंती वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये स्कूटर बाईक आणि कार्स यांचा समावेश होतो. Auto Expo २०२३ मध्ये अनेक अनेक आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांनी आपली इलेक्ट्रिक मॉडेल्स लॉन्च केली आहेत. सध्या भारत लिथियमसाठी चीन, जपान , दक्षिण कोरिया, इंडोनेशिया , अर्जेंटिना या देशांवर अवलंबून राहावे लागते. वास्तविक लिथियम हे कोणत्याही प्रकारची बॅटरी तयार करण्यासाठी लागणारा प्रमुख घटक आहे.

जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील सलाल-हिमाना प्रदेशात लिथियमचा साठा सापडला आहे. देशात याचे एकूण ५१ ब्लॉक सापडले आहे. यापैकी ५ ब्लॉकमध्ये लिथियम, गोल्ड, पोटॅश, मॉलिब्डेनमचे साठे आहेत. २०१८ ते आतापर्यंत हे ब्लॉक्स शोधण्यात आले आहेत. याशिवाय १७ ब्लॉक्समध्ये कोळशाचा साठा आहे. लिथियमचे अनेक फायदे आहेत. परंतु याचा सर्वाधिक वापर रिचार्जेबल बॅटरी बनवण्यासाठी होतो. गुरुवारी झालेल्या ६२ व्या सेंट्रल जिओलॉजिकल प्रोग्रामिंग बोर्डाच्या (CGPB) बैठकीत १५ इतर संसाधन भूवैज्ञानिक अहवाल आणि ३५ भूवैज्ञानिक ज्ञापनांसह हा अहवाल संबंधित राज्य सरकारांना सुपूर्द करण्यात आला आहे.

मात्र जम्मू काश्मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लिथियमचा साठा सापडल्यामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादन क्षमतेला अधिक बळ मिळेल. तसेच आता देशातच लिथियम सापडल्यामुळे ते आयात करावे लागणार नाही. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होणार का ? याची उत्सुकता ग्राहकांना नक्कीच असणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय