महादेव कोळी मित्र मंडळ – मुंबई यांच्या वतीने आयोजन
अकोले : महाराष्ट्रातील सह्याद्री च्या रतनगडाच्या पायथ्याशी भंडारदरा जलाशयाजवळ मौजे भंडारदरा या गावी महादेव कोळी मित्र मंडळ, मुंबई व आदिवासी क्रांती दल महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यामाने पांरपारिक आदिवासी महादेव कोळी सांस्कृतिक वाघबारस कार्यक्रम येत्या रविवारी तमाम हजारो आदिवासी समाजबांधवांच्या उपस्थित मध्ये साजरा करण्यात आला.
या वेळी वाघबारस चे महत्त्व पटवून देऊन आपली आदिवासी संस्कृती रूढी प्रथा पंरपरा भविष्यात टिकली पाहिजे. या करीता महादेव कोळी मित्र मंडळाचे अध्यक्ष मधुकर तळपाडे यांनी समाजबांधवांना वाघबारस चे महत्त्व पटवून सांगितले व समाजाने सामाजिक कार्यक्रम निमित्ताने एकजूट व एकोपा टिकवून ठेवावा. छोट्या मोठ्या ऊद्योग व्यवसाय निर्माण करून अर्थिक उन्नती साधण्यासाठी स्वंयरोजगार निर्माती कडे भर देण्यात यावा तसेच या वेळी उपस्थित नाशिक मुंबई ठाणे पुणे व अहमदनगर जिल्हातील विंविंध आदिवासी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रंसगी अकोले तालुक्यातील युवा ऊद्योजक महेश धिंदळे ( आदिवासी विकास विभाग च्या वतीने राज्यपाल यांच्या हस्ते आदिवासी उद्योजक पुरस्कार प्राप्त ), (मशरूम बॉय) यांनी आपल्या मशरूम व्यवसाया संदर्भात मार्गदर्शन केले व शाहीर ढवळा ढेंगळे यांनी आदिवासी संस्कृती बदल समाजाला मोलाचे मार्गदर्शन केले तर आदिवासी गायक शरद टिपे यांनी आपल्या गायनातून तमाम उपस्थित समाजबांधवांची मने जिंकली.
तसेच आदिवासी पेसा कायद्या वर मार्गदर्शन कराताना पेसा चित्रपट निर्माते कुंडलिक केदारी यांनी पेसा कायद्याचे महत्त्व पटवून सांगितले. या कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
तसेच अकोले तालुक्यातील युवा नेते व आदिवासी कार्यकर्ते गणेश डगळे यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व नियोजन व्यवस्थित पार पाडले. मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.