Thursday, September 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमोरया गोसावी मंदिर परिसरातील फेरीवाल्यांवरील अन्यायकारक निर्बंध हटवा - काशिनाथ नखाते

मोरया गोसावी मंदिर परिसरातील फेरीवाल्यांवरील अन्यायकारक निर्बंध हटवा – काशिनाथ नखाते

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि ब क्षेत्रीय कार्यालय आणी पोलिस यांचेकडुन  मोरया गोसावी मंदिर परिसरातील विक्री करणारे पथ विक्रेत्यांवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. वास्तविक चतुर्थी, गणेश जयंती आणि संजीवन समाधी महोत्सव कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भक्त येत असून या भक्ताच्या सेवेकरिता फेरीवाले स्वस्तात वस्तू उपलब्ध करून देत असतात मात्र महापालिका आणि पोलिस प्रशासनावर त्यांच्यावर निर्बंध घालून त्यांच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे हा अन्याय दूर करून तातडीने त्यांचे व्यवसाय सुरू द्यावेत हा व्यवसाय म्हणजे पिढ्यानपिढ्या सुरू आहे आणि शहर आता झालेलं आहे हे अन्यायकारक निर्बंध हटवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त,  पोलीस आयुक्त तसेच मुख्य विश्वस्त मंदार देव यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. राजेश माने, अनिल बारवकर, इरफान चौधरी, राजू बिराजदार आदींच्या स्वाक्षरी आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असणाऱ्या मोरया गोसावी मंदिर परिसरामध्ये सुमारे पस्तीस वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून मोरया गोसावी समाधी महोत्सव, यात्रा ,गणेश जयंती ,गणेश उत्सव, संकष्ट चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी होत असते यानिमित्ताने शहर परिसरातील विविध भागातील एकूण १८०० पथ विक्रेते कपडे, घरगुती वस्तू, दैनंदिन आवश्यक वस्तू, सौंदर्य प्रसाधने, खेळणी सह दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तूंची विक्री अल्पदरात देऊन ते भाविकांची सेवा करत आहेत. या एका दिवसाच्या व्यवसायामुळे त्यांना समाधानकारक नफा मिळत असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. ग्राहकांनाही अत्यंत कमी दरामध्ये विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध होत आहेत. दर्शनासह वस्तू खरेदी होईल या उद्देशाने भाविक येत असतात. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पोलिस  प्रशासन यानीं अचानक निर्णय घेऊन येथे विक्री करणाऱ्या विक्रेत्यावरती बंदी घालण्यात आली आहे. हे अत्यंत चुकीचे असून मानवी हिताचे नसल्याचेही म्हटले आहे.

महासाधू मोरया गोसावी महोत्सव देवस्थान तर्फे २५ डिसेंबर पर्यंत हा उत्सव आनंदात सुरू आहे. मात्र हातावरचे पोट असणाऱ्या त्यांच्या कुटुंबामध्ये घोर निराशा निर्माण झाली आहे हे सचोटीने व्यवसाय करून जगणाऱ्या गोरगरीबांवर होनारा अन्याय मोरया गोसावी यानां कसे मान्य होईल. प्रशासनाने पथ विक्रेता अधिनियम २०१४ या कायद्यानुसार त्यांना व्यवसाय करता यावा, अशी व्यवस्था करण्यात यावी. त्यांच्यासाठी नियम व अटी लावून व्यवसायासाठी नियोजण करावे, अन्यथा यामुळे अनेक लोक बेरोजगार होणार असून त्यांची रोजीरोटी हिरावली जाणार आहे याबाबत आपण तातडीने बैठक घेऊन सदरच्या पथ विक्रेत्यांचे  व्यवसाय सुरू करण्यासाठी निर्णय घेण्यात यावा. अन्यथा लोकशाही मार्गाने आनंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय