Salman Khan : अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानकडे लॉरेन्स बिश्नोईसोबत असलेले वैर संपवण्यासाठी तब्बल 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या धमकीचा मेसेज मुंबई ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सॲपद्वारे मिळाला असून,धमकी हलक्यात घेतल्यास सलमानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट होईल, असा थेट इशारा देण्यात आला आहे. हा मेसेज पाठवणाऱ्या तर्फे आपण लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे
12 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर सलमान खानला पुन्हा धमकी आल्याने त्याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’ बाहेर 24 तास पोलिसांचा कडेकोट पहारा असून, जवळपास 100 पोलिस अधिकारी आणि जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्हींच्या मदतीने सलमान खानच्या सुरक्षेवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. तसेच बँडस्टँड आणि गॅलेक्सी अपार्टमेंट्सजवळ 60 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
या धमकीमुळे सलमान खानच्या सुरक्षेसंबंधी चिंता वाढली असून, सलमानच्या सुरक्षेत कडकोट वाढ करण्यात आली आहे.
Salman Khan
हेही वाचा :
देशभरात ‘इमर्जन्सी’ लागणार, महत्वाची माहिती समोर
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल
पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती