Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतला तिच्या बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ चित्रपटासाठी सेन्सॉर बोर्डाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.कंगानाने आपल्या इंस्टाग्राम स्टेटसला आणि ट्वटिरला इमर्जन्सी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे, ही माहिती देताना मला अत्यानंद होत असल्याचे म्हटले आहे. अनेक महिन्यांपासून वादात अडकलेला हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. सेन्सॉर बोर्डाने (CBFC) या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले असून, काही सुधारणा केल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रदर्शनाला मंजुरी दिली आहे.
इमर्जन्सी चित्रपटाची तारीख जाहीर झाल्यानंतरही हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला होता. त्यामुळे, चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, होणार की नाही याची चर्चा बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात रंगली होती.
सेन्सॉर बोर्डाने सूचवलेल्या बदलानुसार इमर्जन्सी चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने आता या चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे.
कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने काही आक्षेप घेतल्यामुळे प्रदर्शन लांबले होते. मात्र, आवश्यक दुरुस्त्या केल्यानंतर चित्रपटाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या सूचनांनुसार, 10 मोठे बदल आणि तीन सीन हटवण्यात आले आहेत. तसेच, वादग्रस्त ठिकाणी वस्तुस्थिती दाखवावी अशी सूचना दिली होती, ती पूर्ण केल्यानंतरच चित्रपटाला मंजुरी मिळाली आहे.
कंगनाने स्वतः या बातमीची माहिती सोशल मीडियावरून दिली असून, ‘इमर्जन्सी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे सांगितले. सेन्सॉर बोर्डाने काही सीन कापण्याचे आणि वादग्रस्त विधानांच्या ठिकाणी वस्तुस्थिती दाखवण्याचे आदेश दिले होते, ज्यांचे पालन करून चित्रपटात आवश्यक बदल करण्यात आले आहेत.
यापूर्वी ‘इमर्जन्सी’ चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता, परंतु सेन्सॉर बोर्डाच्या मंजुरीअभावी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. इमर्जन्सी चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. स्वत: अभिनेत्रीने याबाबत सोशल मीडियातून माहिती दिली आहे.या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अंतिम तारीख लवकरच जाहीर होईल, असे कंगनाने सांगितले आहे.
Kangana Ranaut
हेही वाचा :
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल
पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित
सर्वात मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती