Saturday, April 27, 2024
Homeजिल्हामयत अक्षय भालेरावच्या निवासस्थानी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्ठमंडळाने दिली भेट

मयत अक्षय भालेरावच्या निवासस्थानी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्ठमंडळाने दिली भेट

सोमवारी डाव्या आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

नांदेड : शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोंढार तर्फे हवेली येथे तारीख एक जून रोजी बौध्द युवक अक्षय भालेराव यांचा चाकूने भोसकून निर्घृन खुन करण्यात आला असून या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्य हादरले असून घडलेली घटना खूपच गंभीर व निषेधार्ह आहे. अक्षय भालेराव यांचा दुसरा भाऊ आकाश भालेराव यांच्यावर देखील चाकूने वार करून जखमी केले आहे. त्या पीडित कुटूंबीयांची भेट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने शनिवारी बोंढार येथील त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष जाऊन घेतली.

शिष्टमंडळामध्ये माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभणे, जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ.विनोद गोविंदवार, जिल्हा कमिटी सदस्य तथा नांदेड शहर आणि तालुका सचिव कॉ.गंगाधर गायकवाड, जि.क.सदस्य कॉ.मंजूश्री कबाडे, शहर कमिटी सदस्य कॉ.लता गायकवाड व कॉ.जयराज गायकवाड आदींचा समावेश होता.

हत्या करणारे सर्वजन सवर्ण असून त्यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी व खुनाच्या गुन्ह्या सह विविध कलमान्वये ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अ क्षय भालेराव हत्याकांडाच्या निषेर्धात विविध मागण्या घेऊन दि.५ जून रोजी वेळ दुपारी १२ वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात येणार आहे.

या निदर्शने आंदोलनात डावी लोकशाही आघाडीचे घटक पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनता दल (सेक्युलर) हे सहभागी होणार आहेत अशी माहिती माकप सचिव कॉ. गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

 हे ही वाचा :

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

 नोकरीच्या बातम्या : 

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय