Friday, May 17, 2024
Homeआंबेगावघोडेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

घोडेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

घोडेगाव : घोडेगाव येथे आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र व एसएफआय संघटनेच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात कॉम्रेड शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी बोलताना आदिम संस्थेचे राजू घोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या, कार्याच्या केंद्रस्थानी माणूस आणि मानवतावाद होता. म्हणून त्यांनी त्यावेळी होणाऱ्या माणसाच्या शोषणाचे वास्तव आपल्या साहित्यातून मांडले. मात्र आज सर्वांच्या केंद्रस्थानी पैसा आहे. आज देशात सुरु असलेल्या शोषणाविरुद्ध कोणीच बोलत नाही, हि मोठी शोकांतिका आहे. यावेळी बोलताना राजू घोडे यांनी मांडले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समीर गारे यांनी मांडले. यावेळी आदिम संस्थेचे बाळू काठे, एसएफआय आंबेगाव तालुका समितीचे सचिव समीर गारे, अध्यक्ष दिपक वालकोळी, राहुल कारंडे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय