Friday, November 22, 2024
Homeजिल्हाChhatrapati Sambhajinagar : एसएफआयचे ४२ वे छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिवेशन मोठ्या उत्साहात...

Chhatrapati Sambhajinagar : एसएफआयचे ४२ वे छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न !

Chhatrapati Sambhajinagar : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) चे ४२ वे छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिवेशन १६ मार्च २०२४ रोजी शहरातील एसएफआय जिल्हा कार्यालय, सिटू भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

अधिवेशनाची सुरुवात एसएफआयचा स्वातंत्र्य,लोकशाही, समाजवादाचा ध्वज फडकावून आणि शहीद भगतसिंग यांना अभिवादन करून करण्यात आली. अधिवेशनाच्या मंचाला सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची माजी राज्य अध्यक्ष व चळवळीतील कार्यकर्ते अमोल खरात मंच, सभागृहाला केरळ येथील एसएफआय चे विद्यार्थी नेते शहीद धीरज सभागृह तर अधिवेशन परिसराला थोर कम्युनिस्ट तथा शेतमजूर नेते कॉम्रेड कुमार शिराळकर नगर असे नाव दिले गेले होते.

अधिवेशनाचे उद्घाटन एसएफआयचे माजी विद्यार्थी नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष डॉ. लोकेश कांबळे यांनी केले. अधिवेशनास राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ यांनी मार्गदर्शन केले. तसेच एसएफआय चे बीड जिल्हा सचिव विष्णू गवळी व किसान सभेचे नेते कॉ.ऍड.भगवान भोजने यांनी अधिवेशनास आणि नवीन जिल्हा कमिटीला सदिच्छा दिल्या. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सत्यजित मस्के हे होते; तर सूत्रसंचालन मनीषा बल्लाळ यांनी केले.

त्यानंतर अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्रात जिल्हा सचिव मनीषा बल्लाळ यांनी ‘एसएफआयच्या मागील कार्याचा, जिल्ह्यातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल’ मांडला. तसेच अधिवेशनात पुढील ठराव घेण्यात आले. (१) जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक देण्याचा व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडा. (२) ऊसतोडणी कामगारांच्या पाल्यासाठी घोषित केलेले वसतीगृह तात्काळ सुरू करा. २) नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा. ३) विद्यार्थिनी व महीला अत्याचार विरोधात लढा तीव्र करा. ४) शैक्षणिक परिसराचे होणारे अवैज्ञानिकरण व धर्मांधिकरण हाणून पाडा ५) शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध समस्या व मागण्या सोडवण्यासाठी लढा उभा करा. यासहीत विविध ठराव यामध्ये एकमताने पारित करण्यात आले. त्यानंतर अहवाल आणि ठरावावर प्रतिनिधींनी चर्चा केली. त्यानंतर सर्वानुमते अहवाल आणि ठराव पास करण्यात आले.

अधिवेशनाच्या अध्यक्ष मंडळाचे कामकाज गणेश शिंदे, गणेश अलगुडे, यांनी तर संचालन समितीचे मनीषा बल्लाळ व प्रकाश वाव्हळे कामकाज यांनी केले. मिनिट्स कमिटीचे कामकाज अमरदीप अवचार व कुलदीप कासारे यांनी पार पाडले; अधिवेशना दरम्यान यात प्रतिनिधींनी वेगवेगळे क्रांतिकारी गीत ही गायली.

या अधिवेशनात १९ सदस्यांची एसएफआयची नवीन छत्रपती संभाजीनगर जिल्हा समिती निवडण्यात आली. त्यामध्ये नवीन जिल्हा अध्यक्ष म्हणून मनीषा बल्लाळ तर जिल्हा सचिव म्हणून गणेश शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रतिक बोर्डे,सहसचिव म्हणून अमरदीप अवचार,सचिव मंडळ सदस्य म्हणून अरुण मते,मुनीर सय्यद व निमंत्रीत सचिव मंडळ सदस्य म्हणून प्रिया झोरे यांची निवड करण्यात आली.

जिल्हा समिती सदस्य म्हणून सत्यजित मस्के,पल्लवी बोरडकर, गणेश शिंदे, प्रकाश वाव्हळे, अभिषेक शिल्पे, पवन मानवतकर, तेजस्विनी अस्के, बालाजी नेहरकर, अभिषेक सोरमार, व यशराज यांची निवड करण्यात आली आहे. एसएफआयच्या नवनिर्वाचित बीड जिल्हा समितीचे नेतृत्व व सर्व नव्याने निवड झालेल्या सदस्यांचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले.

या अधिवेशनात छ.संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाभरातील विविध विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाले होते. एसएफआयच्या अधिवेशनाचा समारोप ‘हम होंगे कामयाब’ या स्फूर्तीदायी गीताने करण्यात आला.

whatsapp link

हे ही वाचा :

धक्कादायक : पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, एकाचा मृत्यू

कळपातून उधळलेला बैल थेट कारमध्येच घुसला; नंदुरबारमधील घटना

जुन्नर : मुलीच्या बालविवाह प्रकरणी आई-वडिल, नवरदेव, सासु-सासरे, भटजीसह 8 जणांवर गुन्हा

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची आज सांगता सभा

अधिसूचना ते मतमोजणी लोकसभा निवडणुकीचे संपुर्ण वेळापत्रक

संबंधित लेख

लोकप्रिय