पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. १७ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आमदार अण्णासाहेब बनसोडे, प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनिल मगरे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्या प्रकारे गळ्या तिल निळ्या रंगाची मफलर खाली टाकली या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला, त्यांचा फोटो ला चप्पलाने मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी आव्हाडावर ऍट्रॉ्सिटी दाखल करावी, व शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडाची पक्षातून हाकाल पट्टी करावी अशी मागणी केली व तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
आंदोलनास प्रदेश सरचिटणीस ऍड. गोरक्ष लोखंडे, प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे, झोपडपट्टी सेल अध्यक्षा सुनिता अडसूळे, कार्याध्यक्ष. यश बोथ, कार्याध्यक्ष मीरा कांबळे, रजनी गोसावि, कुमार कांबळे,उपाध्यक्ष अनिल औसरमल, लॉरेन्स साळवे, संजय बनसोडे, नितीन अडसूळ, रोहित औसरमल, दिनेश भालेराव, दत्ता गायकवाड, विजय पोटे, उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, किरण पारखे, धनाजी तांबे, सुनिल आडागळे, प्रवीण सोनवणे आणि सामाजिक न्याय चे कार्यकर्ते उपस्थित होते.