हडपसर : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील सिनियर व ज्युनिअर विभागातील प्राध्यापक, ऑफिसमधील कर्मचारी व सर्व शिक्षकेतर सेवकांचा पेन आणि गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला. Teacher Day celebration at SM Joshi College, hadapsar
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फिजिकल डायरेक्टर प्रा.दत्ता वासावे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे आय.क्यू.ए.सी. विभागाचे समन्वयक, उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे यांनी उपस्थित प्राध्यापकांचा सत्कार केला. तसेच उपस्थित प्राध्यापक आणि कार्यालयीन सेवक यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, डॉ. शहाजी करांडे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. किशोर काकडे म्हणाले की, कर्मवीर अण्णांनी शिक्षणाची गंगा गोरगरिबांपर्यंत घरादारापर्यंत पोहोचवली. त्यांना रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांनी मोलाची साथ दिली. म्हणूनच रयत शिक्षण संस्थेचा विस्तार झाला. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी समाजातील कनिष्ठ वर्गाला शिक्षण मिळावे यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. कोणत्याही देशाची प्रगती ही शैक्षणिक गुणवत्तेवर होत असते. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा कणा हा शिक्षक आहे. शिक्षकांच्या नैतिकतेवर विद्यार्थ्यांची व पर्यायाने समाजाची नैतिकता अवलंबून असते. त्यामुळे शिक्षकाने नैतिक मुल्ये जोपासणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नम्रता कदम यांनी केले. तर स्टाफ लिस्टचे वाचन डॉ.अतुल चौरे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील ज्युनियर व सिनियर विभागातील सर्व प्राध्यापक, सर्व कार्यालयीन सेवक उपस्थित होते.