Tuesday, January 21, 2025

धक्कादायक : प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण

Muzaffarnagar : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये (Muzaffarnagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराचे लग्न ठरल्याच्या रागातून 22 वर्षीय युवतीने आपल्या 24 वर्षीय प्रियकराचा गुप्तांग धारदार शस्त्राने कापून धडावेगळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आठ वर्षांपासून प्रियकर-प्रेयसीमध्ये प्रेमसंबंध होते. प्रियकराने लग्नाचे वचन दिले होते, मात्र त्याचे कुटुंबीयांनी त्याचे लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवल्याचे प्रेयसीच्या लक्षात आले. या विश्वासघाताने चिडलेल्या युवतीने प्रियकराला एका गेस्ट हाऊसवर भेटण्यासाठी बोलावले. तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि संतप्त युवतीने धारदार शस्त्राने त्याचा प्राईव्हेट पार्ट कापून टाकला. तसेच घटनेच्या वेळी दोघेही आक्षेपार्ह स्थितीत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Muzaffarnagar

घटनेनंतर प्रेयसीने स्वतःच्या हाताची बोटंही कापून घेतली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना रुग्णालयात दाखल केले. प्रियकराला प्रथम स्थानिक रुग्णालयात नेले, त्यानंतर मेरठच्या एका वैद्यकीय केंद्रात हलवण्यात आले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्या गुप्तांगाला मोठ्या प्रमाणावर इजा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

ही धक्कादायक घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांनी युवतीला ताब्यात घेतले असून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ

मुंबईत ठाकरे बंधू एकत्र : राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट चर्चेला उधान

ब्रेकिंग : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले

ब्रेकिंग : शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

BMC : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

RITES लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती, आजच अर्ज करा

ब्रेकिंग : राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट घेणार

Related Articles

- Advertisement -

Latest Articles