Thursday, November 21, 2024
Homeग्रामीणसुरगाणा येथे तालुकास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धा उत्साहात…

सुरगाणा येथे तालुकास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धा उत्साहात…

वांगणसुळे (दौलत चौधरी) : जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मितल यांच्या संकल्पनेतून आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी भाषे विषयी असलेली भीती दूर व्हावी तसेच इंग्रजी भाषे विषयी आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी शालेय स्तरावरून ते जिल्हा स्तरावर अशा स्पेलिंग बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

गटशिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे आयोजक मुंबई येथील ज्युड ऑगस्टीन, विस्तार अधिकारी बाबुराव महाले, नुतन विद्यामंदीर येथील प्राचार्य प्रभाकर चव्हाण, केंद्र प्रमुख कृष्णा निरभवणे, वसंत चौधरी, पदवीधर शिक्षक रतन चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ऑगस्टीन म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांसाठी इंग्रजी हि तृतीय भाषा नसून ती एक विदेशी भाषा आहे. इंग्रजी भाषा आत्मसात करण्यासाठी खास असे नियम नाहीत. हि अत्यंत सोपी भाषा असून या विषयी विद्यार्थ्यांनी उगीचच भीती बाळगू नये. सुरुवाती पासूनच याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांकडून या भाषेचा सराव करून घेतल्यास मनात असलेली भीती घालवता येईल. इंग्रजीला जरी वाघिणीचे दुध म्हटले जात असले तरी नियमित सरावाने या भाषेवर प्रभुत्व मिळवणे सहज सोपे आहे. या करीताच हा उपक्रम ग्रामीण भागात राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली, यामध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा अतिशय मोकळ्या आनंदामय वातावरणात उत्साहात पार पडली. यामध्ये गट अ मध्ये – प्रथम क्रमांक हर्षदा शांताराम खंबायत जिल्हा परिषद शाळा चापावाडी, द्वितीय नितीन गोपाळ गायकवाड जि. प. शाळा कोठुळा, हर्षदा यशवंत गावित जि. प. शाळा उंबरठाण, गट ब – प्रथम राजदीप जगन कडवा जि. प. शाळा उंबरठाण, द्वितीय तन्मय तुकाराम थविल जि. प. शाळा मालगव्हाण, तृतीय गौरव महिंद्रा कडवा जि. प. शाळा सुर्यगड, गट क- प्रथम श्रृती संतोष भटकर जि. प. शाळा सुर्यगड, व्दितीय ललित धर्मेंद्र निकुळे जि. प. शाळा तोरणडोंगरी, तृतीय रोशनी बाबुराव निकुळे जि. प. शाळा सुर्यगड, गट ड – प्रथम मोहित दत्तात्रेय भोये जि. प. शाळा सराड, ललिता रघुनाथ थविल जि. प. शाळा मालगव्हाण, तृतीय पुजा कांतीलाल कनोज जि. प. शाळा अंबाठा असे निवड झालेले यशस्वी विद्यार्थी पुढील जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यामध्ये प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांना ३० जून रोजी नाशिक येथील कालिदास कलामंदिर येथे होणाऱ्या जिल्हा स्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धा यशस्वी करीता रतन चौधरी, योगेश ठाकरे, मोतीराम भोये, भागवत धुम, बापुराव पवार, भरत पवार, संजय गवळी, राजेश भोये, माधव चौधरी, लक्ष्मण बागुल, नामदेव चौधरी, रामदास भोये, सादुराम सहारे आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

लोकप्रिय