Thursday, May 2, 2024
Homeग्रामीणधारूर येथे ग्राम स्वच्छता अभियान

धारूर येथे ग्राम स्वच्छता अभियान

उस्मानाबाद: धारूर येथे दि.२२ बुधवार रोजी मराठवाडा जन विकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त अरुण पवार यांच्या प्रेरणेने व लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले सकाळी ठीक ७.३० वाजता भैरवनाथ मंदिर येथून सुरुवात करण्यात आली व विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते ग्रामपंचायत परिसर यापासून वाघमारे गल्लीपर्यंत परिसर स्वच्छ करण्यात आला.


धारूर गावातील लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला यामध्ये सद्गुरू ज्ञान संस्कार केंद्रातील ५ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहभागाबरोबर यावेळी उपस्थित मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार तसेच लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार समाजसेवक रत्नाकर खांडेकर सर महेश गडदे विशाल पवार अभिजीत कामटे बालाजी गुरव सोमनाथ कोरे जयसिंग पाटील श्रीराम कदम महेश गुरव बाळासाहेब कोरे अमर पाटील याबरोबर गावातील युवक वर्गाने मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदवला…!!!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय