Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात

PCMC : महाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात

१०५ रक्तदात्यांचा सह १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणी PCMC

आळंदी / अर्जुन मेदनकर : डुडुळगाव येथे १ मे कामगार, महाराष्ट्र दिन आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तळेकर यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत तसेच अनावश्यक खर्च टाळून रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात आयोजित करण्यात आले. pcmc news

या शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच आरोग्य तपासणी शिबिरात १५० वर नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्यास एक टी शर्ट, प्रमाणपत्र आणि एक तुळशी वृंदावन भेट देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या ४ वर्षां पासून सामाजिक बांधिलकीतून आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येत आहे. सुमारे १०५ रक्तदात्याने यामध्ये सहभाग घेतला. १५० हून अधिक लोकांनी आपले मेडिकल चेकअप करून घेतले. pcmc news

महिला नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. रक्तदान आणि मेडिकल चेकअप शिबिराचे (Health check-up camp) नियोजन टाटा मोटर्स कार प्लांट युनिट अध्यक्ष योगेश तळेकर, प्रदीप तळेकर मित्र परिवार, महिंद्रा अँड महिंद्रा मित्र परिवार, टाटा मोटर्स मित्र परिवार, डुडूळगाव मधील सर्व सोसायटी मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ डूडुळगाव यांच्या वतीने श्री संत सावतामाळी मंदिर डुडूळगाव येथे करण्यात आले.

पिंपरी चिंचवड ब्लडबँक आणि कमलेश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, डुडूळगाव यांच्या विशेष सहकार्याने शिबीर यशस्वी झाले. pcmc news

यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, गणेश सस्ते, पुणे युवासेना जिल्हा प्रमुख धनंजय पठारे, आळंदी शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण, साईनाथ ताम्हाणे, रमेश वहिले, बजरंग वहिले, दामोदर वहिले, सचिन तळेकर, शंकर वहिले, संदिप तळेकर, सागर तळेकर, अमोल धायरकर, उमेश तळेकर, पंडित तळेकर, सचिन पवार, कैलास वहिले, विक्रम वहिले, सचिन वहिले, सागर तापकीर, सागर वहिले, विजय चव्हाण, विजय पोफळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली, ‘या’ पक्षात केला प्रवेश

ब्रेकिंग : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणार निवडणूक

निवडणूकीच्या अगोदर अरविंद केजरीवाल यांना अटक का ? सर्वोच्च न्यायालयाचे ईडीला ५ प्रश्न

काँग्रेस मुख्यालयावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचताही येईना, प्रश्न विचारताच विद्यार्थ्यांची फजिती

ब्रेकिंग : महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात बदल

ब्रेकिंग : अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

ब्रेकिंग : कोरोना लसीचे प्रकरण सर्वोच्च न्यायलायात, बाधितांना भरपाई देण्याची मागणी

मोठी बातमी : माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

सर्वात मोठी बातमी : 100 हून अधिक शाळांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, एकच खळबळ

संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय