Monday, March 17, 2025

दलित, अल्पसंख्याक व महिलांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी वेळीच कठोर कारवाई करा – डॉ. डी.एल.कराड यांची मागणी

नाशिक : दलित, अल्पसंख्याक व महिलांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी वेळीच कठोर कारवाई करावी, अशी मागणी सीटू कामगार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ. डी.एल.कराड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आज महाराष्ट्र राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज ना कुठल्या ठिकाणी दलितांवर व अल्पसंख्यांक समाजावर हल्ले व त्यांचे खून पाडले जात आहेत. महिलांच्या हत्या, बलात्कार अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकर आणि समतेचा पुरस्कार करणाऱ्या संत महापुरुषाचा हा महाराष्ट्र आहे. परंतु याच महाराष्ट्रात माणूसकिला काळीमा फासणारी कृत्ये करणाया प्रवृत्तींनी कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान उभे केले आहे. त्यामुळे राज्यातील दलित अल्पसंख्यांक व महिला भयभीत झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यात दलित तरुण अक्षयची हत्या करण्यात आली, लातूर जिल्ह्यामध्ये मातंग समाजाच्या तरुणांचा खून करण्यात आला, कोल्हापूर व संगमनेर तालुक्यात सकल हिंदूत्ववाद्यांच्या मोर्चाच्यानंतर धार्मिक तणाव निर्माण करून अल्पसंख्यांक समाजाच्या नागरिकांच्या घरावर, दुकानावर दगडफेक करून दहशत निर्माण करण्यात आली आहे. राज्यात रोज ना कुठे जातीवादी व धर्मांध शक्ती कायदा हातात घेऊन कुठलीही भीती न बाळगता दिवसाढवळ्या हल्ले करीत आहेत. कायदा व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. पोलीस प्रशासनाला कोणीही गुन्हेगार घाबरत नाही, असेही म्हटले आहे.

राज्यातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांचे जीवित व वित्ताचे संरक्षण करणे हे राज्य सरकारची जबाबदारी

राज्यातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांचे जीवित व वित्ताचे संरक्षण करणे हे राज्य सरकारची जबाबदारी आहे. परंतु शूद्र राजकारणासाठी समाजामध्ये जातीय व धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकता याव्यात यासाठी समाजामध्ये व्देष आणि तणाव निर्माण केला जात आहे. यामुळे राज्याच्या अर्थचक्रावरही विपरीत परिणाम होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेच्या हिताचे रक्षण करणे आवश्यक आहे. जात धर्माच्या नावावर हल्ले, दंगली करून जातीय व धार्मिक तणाव निर्माण करून राज्याची प्रगती होऊ शकत नाही. यामागे ज्या कोणी शक्ती आहेत त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. याकामी ग्रहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री या नात्याने आपण त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.

तसेच राज्यात जातीय व धार्मिक सलोखा टिकून राहील आणि शांतता अबाधित राहील यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी देखील डॉ. कराड यांनी केली आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

ब्रेकिंग : Facebook आणि Instagram वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसै, वाचा म्हटलंय कंपनीने

गावाचा विकास साधायचाय ? चला तर समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…

आदिवासी विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘स्वयम्’ योजना’ वाचा सविस्तर!

‘आया बहिणी या सरकारच्या राज्यात सुरक्षित नाहीत’, आव्हाड म्हणाले, ‘धार्मिक गोष्टींच्या राजकारण…’

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहायक उद्यान निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Related Articles

- Advertisement -

Latest Articles