Friday, May 3, 2024
Homeताज्या बातम्यानंदूरबार लोकसभेसाठी सुशिलकुमार पावरा २३ एप्रिलला अर्ज दाखल करणार

नंदूरबार लोकसभेसाठी सुशिलकुमार पावरा २३ एप्रिलला अर्ज दाखल करणार

Nandurbar Lok Sabha: नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी (Nandurbar Lok Sabha) बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा (Sushilkumar Pawara) हे अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. २३ एप्रिल रोजी बिरसा फायटर्स संघटनेकडून तुफान बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत ५०० पेक्षा अधिक बाईक रॅलीत शामिल होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यावेळी पावरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

नंदूरबार लोकसभा क्षेत्रात काँग्रेस व भाजप उमेदवारांना टक्कर देणारे एकमेव लोकप्रिय अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा (Sushilkumar Pawara) यांच्या नामांकन साठी बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. तरी या बाईक रॅलीत जास्तीत जास्त बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बिरसा फायटर्स पदाधिकारी गोपाल भंडारी यांनी केले आहे. बाईक रॅलीचे परवानगी पत्र जिल्हाधिकारी नंदुरबार, पोलीस अधीक्षक नंदूरबार, पोलीस निरीक्षक नंदूरबार व तहसीलदार नंदूरबार यांना देण्यात आले आहे.

सुशिलकुमार पावरा यांना शहादा, शिरपूर, धडगांव, अक्कलकुवा, साक्री, नवापूर, तळोदा, नंदुरबार अशा ८ तालुक्यातील अनेक गांवांचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे. तसेच ५८ पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला. मराठा समाजाचाही पाठिंबा मिळाला आहे. सर, आमचे पोस्टल मतदान तुम्हालाच, असे म्हणत सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करणार, असा ठाम निर्धार चूलवड ग्रामस्थांनी केला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय