Friday, May 17, 2024
Homeग्रामीणसुरगाणा : जिल्हा बँकेतील ठेविदारांचे पैसे मिळणार !

सुरगाणा : जिल्हा बँकेतील ठेविदारांचे पैसे मिळणार !

सुरगाणा / गणेश चौधरी : सुरगाणा येथील जिल्हा बँकेतील ठेवीदारांचे पैसे मिळावे यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात येत्या १२ जानेवारी पासून सर्वप्रथम लाख रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांचे रुपये पंधरा टक्के प्रमाणे देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन बॅ॑केचे जनरल मॅनेजर हेमंत गोसावी व अकाऊंट मॅनेजर नितीन ओस्तवाल यांनी यावेळी दिले आहे.

जिल्ह्यात प्रथमच एखाद्या बॅ॑केवर स्व:ताचे पैसे मिळावेत यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी आमदार नितीन पवार, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित, एन. डी. गावित, नगरसेवक रमेश थोरात, शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे, योगेश वार्डे, भरत वाघमारे, भगवान गायकवाड, गोपाळ धुम, सुनिल भोये, राजू पवार आदींसह मोठ्या प्रमाणावर खातेधारक उपस्थित होते. 

यावेळी आमदार नितीन पवार यांनी कळवण मध्ये १३ कोटींचे वाटप करण्यात आले. मात्र सुरगाणा शाखेने सुरगाणा तालुक्यात बत्तीस सोसायटी असतांना केवळ एक कोटी साठ लाख रुपयांपर्यंत का वाटप करण्यात आले असा सवाल बॅ॑केचे अधिकारी गोसावी यांचेकडे उपस्थित केला. निदान पाच कोटी वाटप करायला हवे होते. ही जनता गरीब असून ते त्यांचे पैसे मागत आहेत. पुन्हा आम्हाला मोर्चा काढायला लावू नका. मोर्चा न काढताच कळवणचा विकास केला आहे. त्यामुळे या सर्वांचे पैसे लवकरात लवकर देण्याची स्पष्ट सूचना आमदार पवार यांनी केली. अन्यथा सहकार मंत्रीकडे तक्रार करु असे सांगितले.

यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित यांनी अनेकांचे तीन ते चार कोटी रुपये अडकवून ठेवले असल्याचे सांगितले. संचालक मंडळाने बॅ॑केचा गाडा व्यवस्थित हाकलला नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली असून अनेकजण बेकार झाले आहेत. सुरगाणा तालुक्यासह जिल्ह्यातील देखील ठेवीदारांचे रुपये न मिळाल्यास गरिबांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिंतामण गावित यांनी यावेळी दिला. यावेळी उपस्थित खातेदारांनी देखील पैसे न मिळाल्याने निर्माण झालेल्या समस्या मांडल्या. तर बॅ॑केचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे, एन.डी. गावित आदींनी मनोगत मांडताना ठेवीदारांच्या व्यथा व्यक्त करून पैसे लवकरात लवकर देण्याची मागणी केली.

यावेळी जिल्हा बँकेचे जनरल मॅनेजर हेमंत गोसावी तसेच अकाऊंट मॅनेजर नितीन ओस्तवाल यांनी बारा जानेवारी पासून सर्वप्रथम लाख रुपयांपर्यंत असलेल्या ठेवीदारांचे पैसे दिले जातील, असे लेखी आश्वासन दिले.

पैसे वाटप सुरू होईल तेंव्हा जवळच्या तसेच नातेवाईकांनाच व पक्षभेद न करता खातेदारांना पैसे दिले जावेत अशी स्पष्ट सूचना बॅ॑केतील कर्मचारींना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

१२ जानेवारी पासून पैसे मिळायला सुरुवात केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिंतामण गावित यांनी दिला. सेवानिवृत्त कर्मचारींचे शिष्ठमंडळ घेऊन बॅ॑केच्या वरिष्ठांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सेवा निवृत्त पशु वैद्यकीय अधिकारी चिंतामण गवळी यांनी त्यांचे पैसे मार्चपर्यंत न मिळाल्यास बॅ॑केच्या दारातच आत्महत्या करण्याचा इशारा देत त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय