Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याPune University: ‘तुम्ही दोघे वेगवेगळ्या धर्माचे असताना एकत्र का फिरता’ म्हणत पुणे...

Pune University: ‘तुम्ही दोघे वेगवेगळ्या धर्माचे असताना एकत्र का फिरता’ म्हणत पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण

SPPU Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘लव्ह जिहाद’चा आरोप करत एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला (Savitribai Phule Pune University) ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते. विदेशातील शेकडो विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षणासाठी येतात. जागतिक पातळीवर विद्यापीठाची एक वेगळी ओळख असताना तुम्ही दोघे विविध धर्माचे असताना एकत्र का फिरता म्हणत मारहाण केल्याची घटना घडली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील आंबेडकर भवन येथे विद्यार्थी-विद्यार्थीनीचा पाठलाग करून हिंदुत्ववादी संघटनेच्या १०-१५ कार्यकर्त्यांनी दोघांच्या आधारकार्डची मागणी केली. तसेच दोघांच्या धर्माबाबत विचारणा केली. तसेच आम्ही एका हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहोत म्हणत दमदाटी केली. या घटनेमुळे विद्यापीठ आवारात एकच खळबळ उडाली.

मिळलेल्या माहितीनुसार, मारहाण झालेला तरुण हा विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्राचा विद्यार्थी असून तो आणि त्याची मैत्रीण हे दोघे विद्यापीठातील उपहारगृहातून जात असताना ही घटना घडली.

तुम्ही दोघे वेगवेगळ्या धर्माचे असताना एकत्र का फिरता ? तुमचे लोक आमच्या मुलींना लग्न करून फसवतात, असे बोलून विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांला मारहाण केली. तसेच मुलीला धक्काबुक्की केली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या डोक्याला जखम झाली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पिडीत कुटूंबीयांशी फोनवरून, तुमच्या मुलाला ताबडतोब घेऊन जा, प्रवेश रद्द करा नाहीतर जीवानिशी मारून टाकू अशी धमकी दिली. तसेच पिडीत मुलाला बळजबरीने गाडीवर बसवून हॉस्टेल गेटवर सोडले, आज रात्री हॉस्टेलचे सामान घेऊन विद्यापीठ सोड नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे पिडीत विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.

दरम्यान, या प्रकरणी विद्यापीठाच्या वसतिगृह प्रमुखांकडे लेखी तक्रार देण्यात आली असून याबाबत रात्री उशिरापर्यंत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच पुणे शहरातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू

मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार

कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

संबंधित लेख

लोकप्रिय