Friday, May 10, 2024
Homeकृषीमाकप व किसान सभे तर्फे दुध उत्पादक शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन

माकप व किसान सभे तर्फे दुध उत्पादक शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन

माजलगांव (ता.२३): मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, किसान सभेचे उपाध्यक्ष कॉ.मुसद्दीक बाबा सर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक २३ रोजी माजलगांव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आले.

सध्या राज्यात दूध आंदोलन चांगलेच तापले आहे. राज्यभरात दूध उत्पादक सरकार विरोधात दगडाला दूधाने अभिषेक घालत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आंदोलन करण्यात आले

कोरोनरच्या पार्श्वभूमीवर देशभर लागु आसलेल्या लॉकडाऊन मुळे जनता अगदी त्रस्त आहे अशा वेळी जनतेला सरकारने दिलासा देऊन मदत केली पाहिजे केवळ घोषणा करून चालणार नाही तर त्यावर प्रत्यक्ष काम होणे आवश्यक आहे.म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

देशातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक विद्यार्थी आणि दूध उत्पादकाच्यां समस्यांना घेवुन स्वतंत्र सेनानी कैप्टन लक्ष्मी सहगल यांच्या स्मृति दिनी आज २३ जुलै रोजी आंदोलन करून नायब तहसीलदार रामदासे साहेब यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यामध्ये- दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात  १० रुपये प्रतिलिटर अनुदान  वर्ग करा, दुधाला शासकीय ३० रुपये प्रमाणे भाव द्या,लॉकडाऊन काळात प्रत्येक कुटुंबाला रेशन म्हणून मोफत धान्य द्या व प्रत्येक कुटुंबाला  ७५०० रुपये प्रतिमाहिना मदत म्हणून द्या, शेतकऱ्यांना पीककर्जाचे त्वरित वितरण करा, पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना तारीख वाढवून द्या, कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत, लॉकडाऊनच्या आडून कामगार कायद्यामध्ये जाचक बदल करणे थांबवा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मजबूत करा आणि कोरोना महामारीच्या काळात खाजगी रुग्णालये सेवेसाठी ताब्यात घ्या, बेरोजगार युवकांना नोकरी द्या. रोजगार हमीचा विस्तार करा, महिलांवरील वाढत्या अत्याचाराला रोखा,  पुरोगामी, डाव्या, आंबेडकरी राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्याखाली अटक करणे थांबवा,वाढत्या जातीय अत्याचाराला पायबंद करा इत्यादी मागण्यांचा समावेश होता. 

यावेळी कॉम्रेड सय्यद याकुब, कॉम्रेड रुपेश चव्हाण, शेख मुस्तकीम,  सय्यद रफिक, सय्यद फारुख,अशोक बनसोडे, संतोष शिंदे, सुमंत जाधव, रावसाहेब गोरे, मधुकर शिंदे, पटेल, आसाराम घेणे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय