Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयशपथ विधी दरम्यान "जय भवानी-जय शिवाजी" या घोषणेवर "हे घर नाही, माझे...

शपथ विधी दरम्यान “जय भवानी-जय शिवाजी” या घोषणेवर “हे घर नाही, माझे चेंबर आहे” व्यंकय्या नायडू

(नवी दिल्ली) :-  राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी  राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. यावेळी महाराष्ट्रातून भाजपाचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य उदयनराजे यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.  शपथ घेण्याबरोबरच उदयनराजे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी-जय शिवाजी अशी घोषणा दिली. ज्यावर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिला.

    उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले की, “हे घर नाही, माझे चेंबर आहे. मी सभागृहातील सर्व नवीन लोकांना सांगतो की शपथ घेताना कोणतीही घोषणाबाजी करू नये. कोणतीही घोषणा रेकॉर्डवर जाणार नाहीत. येथे कोणतीही घोषणाबाजी करण्याची सुविधा नाही, म्हणून भविष्यात सर्व सदस्यांनी याची काळजी घ्यावी. राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या या प्रतिक्रियेवर शिव भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार नवनिर्वाचित राज्यसभा सदस्याने सदर कायद्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे शपथ घेणे बंधनकारक आहे. तसेच या  कायदानुसार प्रथा आणि संसदीय परंपरेने बंधनकारक आहे. परंतु आजपर्यंत विविध पक्षांच्या खासदारांनी घटनाच्या बाहेर जाऊ घोषणा दिल्या आहेत. हे पूर्णतः बेकायदेशीर, चुकीचे आणि अनैतिक आहे. या बाबींकडे दुर्लक्ष केले जाते, ते खूप घातक आहे. असेच जर होत राहिले तर प्रत्येक लोक आपआपल्या प्रांताच्या घोषणा देतील, त्यामुळे प्रांतवाद वाढू शकतो, धर्म वाद वाढू शकतो, पंथ वाद वाढू शकतो, यातून कायद्याला हरताळ फासला जाईल. मग प्रथा, परंपरा आणि कायदा याला काहीच महत्व राहणार नाही. ज्या पक्षाची जास्त ताकद आहे, तो तितक्या ताकदीने आणि राजकीय सोयीचे घोषणा  देतील, यातून मोठा विस्कळीतपणा येऊन आपल्या देशाची आणि राज्यघटनेची अखंडता धोक्यात येईल.

 ऍड. विशाल जाधव –

कायद्याचे अभ्यासक

    या प्रकरणावर ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’ व्यंकय्या नायडू यांना “जय भवानी, जय शिवाजी” लिहुन २० लाख पोस्ट कार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

     दरम्यान, महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, कॉंग्रेस नेते राजीव सातव, शिवसेनेचे नेते प्रियंका चतुर्वेदी आणि भारतीय जनता पक्षाचे भागवत कराड यांचा समावेश आहे. रामदास आठवले आणि उदयनराजे यांनी इंग्रजीत, हिंदीमध्ये शरद पवार आणि भागवत कराड, प्रियंका चतुर्वेदी यांनी शपथ घेतली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय