Friday, April 26, 2024
Homeग्रामीणऔरंगाबादला तुफानी पाऊस, मराठवाड्यात पाणीच पाणी

औरंगाबादला तुफानी पाऊस, मराठवाड्यात पाणीच पाणी

औरंगाबाद : शहराला रात्री मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या मेघगर्जनेसह पडत असलेल्या या तुफान पावसामुळे वसाहती जलमय झाल्या आहेत. शुक्रवारी दुपारी शहरात जोरदार पाऊस बरसला. संध्याकाळी पावसाने उसंत घेतल्यानंतर मध्यरात्री पावसाने शहरात थैमान घातले. पहाटे ढगफुटी सदृश्य पावसाने पुन्हा एकदा औरंगाबादला झोडपून काढले आहे.

औरंगाबाद शहरामध्ये 25 मिनिटांमध्ये 52 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कमी वेळेत पडलेल्या या पावसामुळे सुखना नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. हे पाणी गावांमध्य शिरले आहे. या तुफान पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

9 दरवाजे पुन्हा उघडले

जायकवाडी धरणाचे आपत्कालीन 9 दरवाजे पुन्हा उघडले आहेत. यामधून 90 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. गेट क्र. 1 ते 9 असे एकुण 9 गेटस 0 फुटावरुन 1.5 फुट उंचीवर उघडले आहेत. अशाप्रकारे 14148 क्यूसेक विसर्ग गोदावरी नदी पात्रात वाढवुन 89604 क्युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात येणार आहे.

मराठवाड्यात यंदा पाणीच पाणी !

नेहमी दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या मराठवाड्यात 679 मिमी सरासरी असताना 1 जून ते 30 सप्टेंबरअखेर 1020 मिमी म्हणजे तब्बल 150 टक्के पाऊस झाला. बीडसारख्या दुष्काळी भागात सरासरीच्या 175 टक्के पाऊस बरसला. मराठवाड्यात 53 तालुक्यांत एक हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. अवर्षणप्रवण तालुक्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला. मराठवाड्यातील सर्व 11 धरणे भरली असून जवळपास 30 लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय