Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणसुरगाणा : माळे दुमाला शिवारात कार व मोटर सायकलाचा भीषण अपघात

सुरगाणा : माळे दुमाला शिवारात कार व मोटर सायकलाचा भीषण अपघात

spot_imgspot_imgspot_imgspot_img

सुरगाणा (दौलत चौधरी) : दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला शिवारात रोकडपाडा येथील मोटर सायकलस्वार माधव खंडू बंगाळ हे काल एकाला कामावर सोडून घरी परतत असताना माळे दुमाला शिवारात चारचाकी कार क्रमांक GJ.15. CK.1633 या चारचाकी कारने MH.15. HJ.9585 या क्रमांकाच्या मोटार सायकलला जोरदार धडक दिली. यावेळी मोटार सायकलस्वार माधव खंडू बंगाळ राहणार रोकडपाडा हे जागीच ठार झाले. त्यांना वणीच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. अपघात एवढा भीषण होता कि दोन्ही गाड्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद वणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय