Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणआदिवासी भागातील प्रश्नांबाबत आमदार सुनिल शेळके यांना बिरसा क्रांती दलाचे निवेदन

आदिवासी भागातील प्रश्नांबाबत आमदार सुनिल शेळके यांना बिरसा क्रांती दलाचे निवेदन

Maharashtrajanbhumi

मावळ  : मावळ तालुक्यातील अंदर मावळ या आदिवासी भागातील प्रश्नांबाबत आमदार सुनील अण्णा शेळके यांना बिरसा क्रांती दल मावळ वतीने निवेदन देण्यात आले. 

आदिवासी भागातील अंदर मावळात आरोग्य सेवा केंद्र सुरळीत चालू करावी, वनविभागाची जागा स्मशानभूमी, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय अशा सार्वजनिक कामासाठी आदिवासी गावांना मिळावी. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोक बेरोजगार आहेत त्यांचे वीज बिल माफ व्हावे, सावळे व कळकराई येथील वीज कनेक्शन सुरळीत चालू करणे अशा अनेक समस्यावर चर्चा करून निवेदन देण्यात आले. 

यावेळी बिरसा क्रांती दल मावळ तालुका अध्यक्ष अंकुश चिमटे, उपाध्यक्ष लहू दगडे, उपाध्यक्ष कांताराम असवले, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मारूती खामकर, पुणे जिल्हा संघटक विक्रम हेमाडे, महासचिव उमाकांत मदगे, प्रसिद्धीप्रमुख मधुकर कोकाटे, अशोक सुपे, बाळू पावशे, अण्णा कोकाटे, लक्ष्मण कावळे, जेष्ठ नेते शंकरराव सुपे, बजरंग लोहकरे, दशरथ आढारी, सुरेश कशाळे, सदुबुवा निसाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय