Friday, May 3, 2024
Homeजिल्हाआशा व गटप्रवर्तकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आशा व गटप्रवर्तकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना विविध मागण्या व संपाबाबत निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सुमारे 70 हजार आशा स्वंयसेविका व 3 हजार 500 पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी दि. १८/१०/२०२३ ते दि.०१/११/२०२३ या कालावधीत त्यांच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. या संपाच्या पार्श्वभुमीवर संप काळात आरोग्य मंत्री यांनी दि. ०१/११/२०२३ रोजी आरोग्य भवन, मुंबई येथे संपाच्या वाटाघाटीसाठी कृति समितीसोबत बैठक घेतली होती. सदर बैठकीत आरोग्य मंत्री यांनी खालील निर्णय घेवुन घोषणा केली होती.

१) आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु. २००० दिवाळीपूर्वी देण्यात येणार, २) आशा स्वंयसेविकांच्या मोबदल्यात रु.७००० ची वाढ, ३) गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु.६२०० ची वाढ आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संप काळातील कामकाज पूर्ण केल्यास त्यांना संपकाळातील मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य मंत्री यांनी दि.०१/११/२०२३ रोजी आरोग्य भवन, मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत कृति समितीला दिले होते. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संपकाळातील कामे पूर्ण केली आहेत. परंतु त्यांचा मोबदला कपात करण्यात आला आहे. तरी कपात केलेला मोबदला आशा स्वंयसेविका व गटप्रतर्वकांना अदा करण्याचे आदेश काढण्यात यावेत.

गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ न केल्यामुळे संप पुढे लांबला. गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ व्हावी याकरीता नरहरी झिरवळ, उपाध्यक्ष विधानसभा यांनी मुख्यमंत्र्याकडे गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ करण्यासाठी शिफारस केली. दि.०९/११/ २०२३ रोजी अप्पर मुख्य सचिवासोबत कृति समितीची बैठक खा.हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यानी अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसेकर यांना मोबाईल फोनवरुन गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६२०० वरुन १०००० रुपयांची वाढ करण्याचे आदेशीत केले. त्यानंतर कृति समितीने संप स्थगीत केल्याचे जाहीर केल्यामुळे दि. १०/११/२०२३ पासुन राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी दैनंदिन कामकाजास सुरुवात केली. 

तसेच आ. भा. कार्ड काढणे, गोल्डन कार्ड काढणे, पीएमएमव्हीवाय चे फॉर्म ऑनलाईन भरणे अशी ऑनलाईन करण्याचे कामे आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक दिवसरात्र मेहनत घेवुन करत आहेत. संप स्थगीत होवुन दीड महिना होवुन गेला परंतु अदयाप शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही. आरोग्य मंत्र्यांना कृति समितीच्यावतीने नागपुरच्या हिवाळी अधिकवेशनात दि. १८/१२/२०२३ रोजी प्रचंड मोर्चा काढून शासन निर्णय त्वरीत काढण्याची विनंती केली परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. परीणामी राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मनामध्ये शासनाप्रति तिव्र नाराजी निर्माण होत चालली आहे. त्यामुळे दि. २९/१२/२०२३ पासून ऑनलाईनच्या सर्व कामकाजावर राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक बहिष्कार टाकत आहेत. आरोग्य मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्याबाबतीत खालील प्रमाणे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.

१. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु.२,००० दिवाळीपूर्वी देण्यात येणार.

२.आशा स्वंयसेवकांच्या मोबदल्यात रु.७,००० ची वाढ

३.गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु.१०,००० ची वाढ

वरील मंजुर केलेल्या मागण्यांचे शासन निर्णय दि.१२/०१/२०२४ पूर्वी निर्गमित करण्यात यावेत. अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने केल्याची माहिती राज्याध्यक्ष कॉ.राजू देसले यांनी दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय