Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडउत्तर भारतात दाट धुके,थंडीचा कहर,विमान उड्डाणे रद्द,रेल्वे वेळापत्रक कोसळले

उत्तर भारतात दाट धुके,थंडीचा कहर,विमान उड्डाणे रद्द,रेल्वे वेळापत्रक कोसळले

दिल्ली:जम्मू,हिमाचल प्रदेश, हरयाणा, पंजाब आणि पूर्व उत्तर प्रदेशात मंगळवारी दाट धुके पसरल्याने हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीच्या बहुतांश भागात थंडीची लाट उसळली आहे,राजधानी दिल्लीत आज पहाटे साडेपाच वाजता किमान तापमान 4.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पालममध्ये 7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दिल्लीसह उत्तर भारतात धुके आणि थंडी कायम असून धुक्यामुळे दृश्यमानतेवर परिणाम होत आहे. आतापर्यंत दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारे 30 उड्डाणे उशीर झाली आहेत तर 17 रद्द करण्यात आली आहेत. डीजीसीएच्या नवीन एसओपीमुळे उड्डाणे रद्द होण्याचे प्रमाण वाढू शकते.
भारतीय हवामान खात्याने थंडीचा प्रकोप अजून 20 जानेवारी पर्यँत राहू शकेल अशी माहिती दिली आहे.

लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडय़ांना फटका बसत आहेत. रेल्वे ट्रकमधील दृश्यमानता कमालीची कमी होत असल्याने लोको पायलटला समोरील सिग्नल दिसत नाहीत.त्याचा 18 एक्सप्रेस गाडय़ांना फटका बसला असून अनेक गाडय़ा चार-पाच तास विलंब झाल्याने प्रवाशांचे प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.दाट धुक्यामुळे रेल्वे ट्रॅकवर दृश्यमानता कमी झाल्यामुळे बहुतांश रेल्वेगाड्या उशिरा धावत आहेत. मध्यरात्रीनंतर गडद होत जाणारी धुक्याची चादर लोको पायलटसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.उत्तर हिंदुस्थानात 20-25 मीटरवरील दिसत नाही. त्यामुळे गोगलगायच्या वेगाने एक्सप्रेस ट्रेन चालवाव्या लागत आहेत.अनेकदा गाडय़ा जागेवरच थांबवण्याची नामुष्की लोको पायलटवर ओढावत असल्याची माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.एअर इंडियाचे सकाळच्या वेळेतील दिल्ली आणि मुंबईचे विमान सोमवारी अचानक रद्द झाले. अचानक विमान रद्द झाल्याने प्रवाशांचे नियोजनच विस्कळीत झाले. दिल्लीतील खराब वातावरणामुळे विमाने रद्द झाल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय